सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) महाराष्ट्राचे नेतृत्व ऋरुतुराज गायकवाडकडे (Ruturaj Gaikwad).  Dainik Gomantak
क्रीडा

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत महाराष्ट्राचे नेतृत्व ऋरुतुराज गायकवाडकडे

दुसरा आक्रमक सलामीवीर यश नहारसह वरिष्ठ फलंदाज केदार जाधवचाही संघात समावेश करण्यात आला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) महाराष्ट्राचे (Maharashtra) नेतृत्व ऋरुतुराज गायकवाडकडे (Ruturaj Gaikwad) देण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेटचा नवा स्टार ऋरुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) 4 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) महाराष्ट्राचे (Maharashtra) नेतृत्व करणार आहे. महाराष्ट्राचा एलिट गट अ मध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. लीग स्टेजचे लखनौमध्ये होणार आहेत. महाराष्ट्राचा सलामीचा सामना तामिळनाडूविरुद्ध (Tamil Nadu) होणार आहे.

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या विजयात महत्त्वाचा वाटा ऋतुराजने उचलला. तसेच केकेआरचा स्टार राहुल त्रिपाठी मेगा यांने देखील या आयपीएलमध्ये उकृष्ट कामगिरी केली आहे. पण अंतिम सामन्यात त्याला कंबरेच्या झालेल्या दुखापतीतून तो अद्याप बरा न झाल्याने नौशाद शेखची महाराष्ट्राच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

दुसरा आक्रमक सलामीवीर यश नहारसह वरिष्ठ फलंदाज केदार जाधवचाही संघात समावेश करण्यात आला आहे. "राहुल त्रिपाठी, सिद्धेश वीर आणि राजवर्धन हंगरगेकर यांच्या जागी स्वप्नील गुगळे, पवन शाह आणि जगदीश झोपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे महाराष्ट्र सीएचे सचिव रियाझ बागबान यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

"सिद्धेश वीरच्या बोटाला फ्रॅक्चर झाले असल्याने तसेच राजवर्धन हंगरगेकरची अंडर-19 चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेत निवड झाली असल्याने, त्याची निवड करण्यात आलेली नाही. महाराष्ट्राच्या गोलंदाजी आक्रमणात उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज प्रदीप दाढे, डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी आणि स्लो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर सत्यजीत बच्छाव यांचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचा संघ पुढील प्रमाणे

संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), नौशाद शेख (उपकर्णधार), केदार जाधव, यश नहार, अजीम काझी, रणजीत निकम, सत्यजीत बच्छाव, तरणजितसिंग धिल्लों, मुकेश चौधरी, आशय पालकर, मनोज इंगळे, प्रदीप दाढे, शमशाल, काझी, काझी. फुलपगार, दिव्यांग हिंगणेकर, सुनील यादव, धनराजसिंग परदेशी, स्वप्नील गुगळे, पवन शहा, जगदीश झोपे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

Goa Assembly Winter Session 2026: गोवा सरकारचे हिवाळी अधिवेशन 12 जानेवारीपासून; रामा काणकोणकर हल्ला, हडफडे आग प्रकरण गाजणार

Goa Fishing Boat Missing: सोमवारी निघाले, पण परतलेच नाहीत! काणकोणच्या समुद्रात मासेमारी बोट गायब; 4 मच्छिमारांचा जीव टांगणीला

SCROLL FOR NEXT