क्रिकेटमधील अत्यंत कूल व्यक्तीबद्दल बोलायचे झाल्यास भारताचा विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) चे नाव लगचे सर्वांच्या समोर येते. धोनीला 'कॅप्टन कूल' (Captain Cool) म्हणतात. अगदी तणावपूर्ण परिस्थितीतही तो शांतपणे आपल्या संघाला विजय मिळवून देतो. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक वेळा हे सिद्धही करुन दाखवले आहे. म्हणूनच त्याने भारतासाठी तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. आयपीएलमध्येही त्याची यशस्वी कर्णधार म्हणून ख्याती आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) तीन वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. तर केवळ एक सीजन वगळता प्रत्येक वेळी प्लेऑफमध्ये त्याचा संघ पोहोचला आहे. त्याच्या संघाने आयपीएल -2021 (IPl 2021) मध्ये प्ले ऑफसाठी जवळजवळ पात्रता फेरीत स्थान मिळवले होते. परंतु चेन्नईच्या अनुभवी खेळाडूच्या मते, धोनी एकमेव कूल व्यक्ती नसून आणखी एक खेळाडू आहे ज्याची प्रतिमा कूल म्हणून पुढे येत आहे.
भारतीय संघाकडून खेळलेला रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) सध्या चेन्नई सुपर किंग्जमध्ये खेळत आहे. त्याने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, धोनीसारखाच एक शांत खेळाडू आहे. 'ऋतुराज गायकवाड' (Ruturaj Gaikwad) असे या खेळाडूचे नाव आहे. या हंगामात गायकवाड उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. सीएसकेच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये उथप्पा म्हणाला, "मला वाटते ऋतुराज गायकवाड याने साकारलेले कॅरेक्टर अविश्वसनीय आहे. तो एक प्रतिभावान खेळाडू आहे. आमचा संघ भाग्यवान आहे की, तो आमच्यासोबत आहे. त्याची वर्तवणूक एकदम धोनीसारखीच आहे - शांत, मस्त. तो एक उत्कृष्ट व्यक्ती आहे. मला त्याचा स्वभाव आवडतो. तो एक अद्भुत खेळाडू आहे.”
गायकवाडचा आयपीएल प्रवास
गायकवाडने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तो फार काही चांगली कामगिरी करु शकला नव्हता मात्र त्याने शेवटच्या सामन्यांमध्ये सलग तीन अर्धशतके केली. गेल्या हंगामात त्याने CSK साठी सहा सामने खेळले आणि 204 धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 120.71 आणि सरासरी 51 होता. त्याने तीन अर्धशतके केली आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या 72 धावा होती. यावर्षी गायकवाडच्या खांद्यावर चेन्नईच्या फलंदाजीची धुरा घेतली संभाळली आहे. तो, फाफ डु प्लेसिससह ऋतुराजने, संघाला एक मजबूत सुरुवात करुन देत आहे. आणि यामुळेच चेन्नई प्लेऑफसाठी जवळजवळ पात्र ठरला आहे. आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांमध्ये गायकवाडने 40.22 च्या सरासरीने 362 धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 137.12 आहे. आतापर्यंत त्याने तीन अर्धशतके केली आहेत. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही असून सध्या टॉप -5 मध्ये दिग्गजांसोबत शर्यतीत आहे.
ऋतुराजने भारतासाठी पदार्पण केले
गायकवाडने भारतासाठी टी -20 (T-20) पदार्पण केले आहे. जुलैमध्ये भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता तेव्हा शिखर धवन संघाचा कर्णधार होता. या दौऱ्यात गायकवाडने टी -20 पदार्पण केले. त्याने भारतासाठी दोन सामने खेळले आहेत आणि 35 धावा केल्या आहेत. ज्या प्रकारे तो फलंदाजी करत आहे, त्याने टीम इंडियामधील आपला दावा मजबूत केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.