Rishabh Pant Sister Dainik Gomantak
क्रीडा

Rishabh Pant Video: ' काही माणूसकी आहे की नाही..' पंतला मुंबईत हलवताना पत्रकारांवर भडकली बहीण

ऋषभ पंतला मुंबईत पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

Rishabh Pant Sister Angry on Reporters: भारतीय क्रिकेट संघाचा 25 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचा 30 डिसेंबर 2022 रोजी सकाळी कार अपघात झाला. या अपघातात जखमी झाल्याने त्याच्यावर डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण बुधवारी त्याला पुढील उपचारासाठी मुंबईला एअरलिफ्ट करून हलवण्यात आले आहे.

दरम्यान, त्याला मुंबईत हलवताना अनेक मीडिया कर्मचाऱ्यांनी त्याची एक झलक कैद करण्यासाठी घेरले होते. यावेळी गर्दी झाल्याने पंतची बहीण त्यांच्यावर चिडली. तिने त्यांना माणूसकी आहे की नाही, असे विचारत राग व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दरम्यान, पंतच्या आरोग्याबद्दल बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार त्याला मुंबईला हलवण्याची सगळी तयारी बीसीसीआयकडून करण्यात आलेली होती. त्याला मुंबईतील कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. तिथेच त्याच्यावर डॉ. दिनशॉ परडीवाला यांच्या निगराणीखाली पुढील उपचार होणार आहेत.

पंतवर मुंबईत त्याच्या लिगामेंट टिअरसाठी शस्त्रक्रिया होणार आहे. तसेच इथे त्याच्या संपूर्ण उपचारावर बीसीसीआयची मेडिकल टीमही लक्ष ठेवून असणार आहे. तसेच बीसीसीआने असेही सांगितले आहे की बोर्डाकडून त्याला या दुखापतींमधून बरे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि आवश्यक तो सर्व पाठिंबा देईल.

बीसीसीआने याआधी दिलेल्या माहितीनुसार पंतला या अपघातादरम्यान डोक्याला दोन खोचा पडल्या आहेत. तसेच मनगटाला, घोट्याला, पाठीला आणि पायांच्या बोटाला दुखापती झाल्या आहेत. याशिवाय त्याच्या गुडघ्यात लिगामेंट टिअर आढळले आहेत. पण पंतची प्रकृती स्थिर आहे.

पंत 30 डिसेंबर रोजी सकाळी दिल्लीवरून रुडकीला येत होता. या प्रवासात त्याची कार डिव्हायरला धडकल्याने त्याचा अपघात झाला. या अपघातानंतर पंतने प्रसंगावधान राखत कारमधून बाहेर येण्याचे प्रयत्न केले. यावेळी त्याला त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या एका बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरने मदत केली. या अपघातात पंतची कार आग लागल्याने पूर्ण जळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT