Rishabh Pant Dainik Gomantak
क्रीडा

Rishabh Pant Accident: मोठी बातमी! पंतला पुढील उपचारासाठी मुंबईला हलवणार

अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतला पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

Rishabh Pant: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघात झाला होता. या अपघातात दुखापतग्रस्त झालेल्या पंतवर सध्या डेहराडूनमध्ये उपचार सुरू आहेत. पण आता त्याला बुधवारी पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात येणार असल्याचे समजत आहे.

पंत 30 डिसेंबर रोजी सकाळी दिल्लीवरून रुडकीला येत असताना नारसन बॉर्डरजवळ त्याचा कार अपघात झाला. अपघातानंतर तो कारमधून बाहेर येण्यात यशस्वी झाला. पण त्याची कार या अपघातात पूर्ण जळाली.

त्यावेळी त्याला त्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका बसच्या ड्रायव्हर आणि कंटक्टरने स्थानिक हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यासाठी मदत केली. त्यानंतर त्याला डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सध्या तिथेच त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पण आता त्याला पुढील उपचारासाठी बुधवारी मुंबईत हलवण्यात येणार असल्याची माहिती दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संचालक शाम शर्मा यांनी दिली आहे. पण त्याला मुंबईतील कोणत्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येणार याबद्दल माहिती मिळालेली नाही.

या अपघातादरम्यान पंतच्या डोक्याला दोन खोचा पडल्या आहेत. तसेच त्याचा पाठीला, मनगटाला, घोट्याला आणि पायाच्या बोटांनाही दुखापती झाल्या आहेत. याशिवाय त्याच्या गुडघ्यामध्ये लिगामेंट टिअर आहेत. या दुखापतींबद्दल बीसीसीआयने माहिती दिली आहे. दरम्यान त्याची प्रकृती स्थिर आहे.

पण, पंतला आता या दुखापतींमधून सावरण्यासाठी साधारण सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता त्याला पुढील सहा महिने तरी क्रिकेटपासून दूर रहावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, बीसीसीआयने त्याला या दुखापतींमधून बाहेर येण्यासाठी शक्य तेवढा पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT