Rishabh Pant Twitter/ @RishabhPant17
क्रीडा

Rishabh Pant: ऋषभ पंतने तब्येतीबाबत दिली मोठी अपडेट, फोटो पाहून तुम्ही म्हणाल...!

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा या वर्षाच्या सुरुवातीलाच कार अपघात झाला.

Manish Jadhav

Rishabh Pant: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा या वर्षाच्या सुरुवातीलाच कार अपघात झाला. रुरकीमध्ये त्याची कार दुभाजकाला धडकली, त्यानंतर पंत गंभीर जखमी झाला.

सध्या सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये चाहत्यांना पंतची सतत उणीव भासत आहे. दरम्यान, पंतने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर करुन चाहत्यांना त्याच्या तब्येतीची मोठी अपडेट दिली आहे.

पंत क्रॅचवर चालत आहे

पंतने ट्विटरवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पंत क्रॅचच्या मदतीने चालताना दिसत आहे. कार अपघातानंतर पंतने पहिल्यांदाच त्याचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. कार अपघातानंतर ऋषभ पंतला खूप दुखापत झाली होती. त्यामुळे पंत बऱ्याच दिवसांपासून खेळापासून दूर आहे. भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत पंत खेळत नाही.

विश्वचषकात प्रवेश करणे कठीण

अपघातानंतर पंत किमान 6 महिने मैदानापासून दूर राहणार आहे. ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, पंत 2023 मध्ये बहुतांश क्रिकेटपासून दूर राहणार आहे. पंतचीही विश्वचषकात खेळण्याची शक्यताही कमी आहे. पंतच्या जागी कसोटी संघात श्रीकर भरतला पदार्पणाची संधी मिळाली. तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये केएल राहुल (KL Rahul) आणि ईशान किशन हे कीपिंगची जबाबदारी घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By- Election: आम्ही चालवू पुढे 'बाबां'चा वारसा! रितेशनी घेतला रवींच्या कार्यालयाचा ताबा, उमेदवारीबाबत पहिल्यांदाच केलं भाष्य

Horoscope: 'या' 3 राशींचे नशीब चमकणार! गुरु-शुक्र केंद्र योग देणार अफाट यश आणि धनलाभ; करिअर आणि व्यवसायातही होणार मोठी प्रगती

Margao Accident: मडगावात भीषण अपघात! कोकण रेल्वे स्टेशनजवळ दुचाकींच्या धडकेत पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू; आरोपी फरार

Goa Today's News Live: गोव्याचा 'अभिनव' पुन्हा चमकला, पंजाबविरुद्ध झळकावलं दमदार शतक!

Amazon Layoffs: टेक विश्वात खळबळ! ॲमेझॉनने 14 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ, दोन टेक्स्ट मेसेज पाठवून केली सर्वात मोठी कर्मचारी कपात

SCROLL FOR NEXT