Rishabh Pant  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA: 'माझे वडीलही विकेटकीपर होते म्हणून मी...': ऋषभ पंत

भारत-दक्षिण आफ्रिका मालिका बायो-बबलशिवाय आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

भारत-दक्षिण आफ्रिका मालिका बायो-बबलशिवाय आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत सध्या संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. 24 वर्षीय पंतला पाहून एके काळी असे वाटले होते की तो महान एमएस धोनीची जागा घेऊ शकणार नाही, पण आता त्याने संघात स्वत:ला ठामपणे सिद्ध केले आहे. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी मालिकेसाठीही त्याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (IND vs SA Rishabh pant)

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20I मालिका सुरू होण्यापूर्वी, पंतने विकेटकिपींग का निवडले याचा खुलासा केला आहे. पंतचे म्हणणे ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की, जर पंतचे वडील यष्टिरक्षक नसते तर कदाचित आज तुम्हाला भारतीय संघाचा यष्टीरक्षक म्हणून पंत दिसला नसता.

एसजी पॉडकास्टवर बोलताना ऋषभ पंत म्हणाला, "माझ्या विकेटकीपिंगमध्ये सुधारणा झाली आहे की नाही हे मला माहीत नाही, पण मी दररोज माझे 100 टक्के देण्याचा प्रयत्न करतो. मी नेहमीच यष्टीरक्षक फलंदाज होतो. लहानपणी मी सुरुवात केली. मी आज विकेट कीपिंग करतो ते माझ्या वडीलांमुळे. कारण ते स्वत:एक चांगले विकेटकीपर होते.

''जर तुम्हाला चांगला यष्टिरक्षक व्हायचे असेल तर तुम्हाला स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चेंडू सोबत शेवटपर्यंत खेळत राहणे.चेंडूवर सतत लक्ष ठेवून राहाणे. कारण कधी- कधी बॉल येतांना दिसत नाही.तेव्हा आपण अल्रट असलो की चांगली कामगिरी करू शकतो. या ठिकाणी ढिलाई करून चालणार नसते.शेवटी, शिस्तबद्ध व्हा आणि आपल्या खेळावर काम करा.'असा सल्ला पंत ने यावेळी बोलतांना दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT