Team India Dainik Gomantak
क्रीडा

T20 WC: टीम इंडिया आफ्रिकेशी भिडणार, केएल राहुलच्या जागी कोण? प्रशिक्षकाने दिले उत्तर

India vs South Africa, T20 WC: यंदाच्या T20 विश्वचषकात (T20 World Cup-2022) भारतीय संघाने आतापर्यंत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

दैनिक गोमन्तक

India vs South Africa, T20 WC: यंदाच्या T20 विश्वचषकात (T20 World Cup-2022) भारतीय संघाने आतापर्यंत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्याने आपले दोन्ही सामने जिंकले असून आता त्याची नजर रविवारी 30 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने हा सामना जिंकल्यास गटातील अव्वल स्थान मजबूत होईलच, सोबत उपांत्य फेरी गाठणे जवळपास निश्चित होईल. तत्पूर्वी, टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांनी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

ऋषभ पंत की राहुल?

पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) सामन्यात ऋषभ पंत की लोकेश राहुल कोणाला संधी दिली जाईल, या प्रश्नावर टीम इंडियाचे (Team India) फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर म्हणाले की, ''सध्या सलामीच्या जोडीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. लोकेश राहुलऐवजी आम्ही ऋषभ पंतला 11 व्या क्रमांकावर आणणार नाही.'' पर्थमध्ये फक्त लोकेश राहुल खेळणार आहे. पंतला संघाने तयार राहण्यास सांगितले असून लवकरच संधी दिली जाईल, असेही ते म्हणाले.

खेळपट्टी पाहिल्यानंतर विचार करु

पर्थची खेळपट्टीही दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आक्रमणाला साथ देईल, असे मानले जात आहे. मात्र, टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम म्हणाले की, 'भारताकडे (India) चार वेगवान गोलंदाज आहेत. आतापर्यंत आम्ही खेळपट्टी पाहिली नाही. खेळपट्टीची पाहणी केल्यानंतरच प्लेइंग इलेव्हनबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.'

ते पुढे म्हणाले की, 'संघ पर्थमध्ये सरावासाठी आला होता, जेणेकरुन परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना खूप महत्त्वाचा असून हे आपल्या सर्वांना माहीत आहे.'

जास्तीत जास्त धावा करण्यावर भर

विक्रम राठोर पुढे असेही म्हणाले की, 'जर टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करायची असेल तर पर्थमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचे त्यांचे लक्ष्य असेल.' हवामानामुळे कमी षटकांच्या सामन्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, 'संघ पूर्ण क्षमतेने तयारी करत आहे.'

पर्थ मध्ये मुकाबला

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना उद्या म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर होणार आहे. भारत सध्या दोन सामन्यांत 4 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यांनी पाकिस्तान (Pakistan) आणि नेदरलँड्सविरुद्ध विजय नोंदवले आहेत. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वे विरुद्धचा सामना पावसात वाहून गेला. गेल्या सामन्यात त्याने बांगलादेशचा 104 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. संघ गुणतालिकेत 3 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

VIDEO: "...अन् डोळ्यासमोर अंधारीच आली!" मेलबर्नमध्ये मोहम्मद रिझवानची फजिती; नाजूक जागी चेंडू लागताच मैदानात उडाली खळबळ

Mangal Gochar 2026: नशिबाची साथ अन् पैशांची बरसात! मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; गुंतवणूकीतून मिळणार मोठा परतावा

SCROLL FOR NEXT