Rishabh Pant in Test Jersey
Rishabh Pant in Test Jersey Dainik Gomantak
क्रीडा

ICC Test Team 2022: एकट्या पंतचा भारताला आधार! असा आहे आयसीसीचा कसोटी संघ

Pranali Kodre

ICC Men’s Test Team 2022: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी साल 2022 मधील सर्वोत्तम कसोटी संघ जाहीर केला आहे. आयसीसीच्या या संघात गेल्यावर्षी कसोटीत दमदार कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंना संधी मिळाली आहे. दरम्यान, यात भारताच्या एकाच खेळाडूचा समावेश आहे.

आयसीसीच्या 2022 वर्षातील कसोटी संघात सहा राष्ट्रीय संघातील खेळाडूंना संधी मिळाली आहे. यामध्ये भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला संधी मिळाली आहे. तसेच या संघात ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक 4 खेळाडूंना संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्यूशेन, पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांना संधी मिळाली आहे.

(ICC Men’s Test Team of the Year 2022 Announced)

तसेच इंग्लंडच्या तीन खेळाडूंना संधी मिळाली असून यात बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो आणि जेम्स अँडरसन यांचा समावेश आहे. बेन स्टोक्सला या संघाचा कर्णधारही करण्यात आले आहे. याशिवाय वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या संघांतील प्रत्येकी एका खेळाडूलाही आयसीसीच्या 2022 कसोटी संघात स्थान मिळाले आहे.

यामध्ये वेस्ट इंडिजचा क्रेग ब्रेथवेट, दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा आणि पाकिस्तानचा बाबर आझम यांना आयसीसीच्या 2022 मधील सर्वोत्तम कसोटी संघात संधी मिळाली आहे.

दरम्यान, या संघात यष्टीरक्षणासाठीही पंतलाच निवडण्यात आले आहे. त्याने 2022 वर्षात भारताकडून कसोटीत सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने या वर्षात ७ कसोटी सामन्यांती १२ डावात 61.81 च्या सरासरीने 680 धावा केल्या. यामध्ये त्याच्या 2 शतकांचा आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने यष्टीरक्षण करतानाही चांगली कामगिरी केली. त्याने 6 यष्टीचीत केले, तर 23 झेल घेतले.

दरम्यान, पंत सध्या 2022 वर्षाच्या अखेरीस कार अपघातामुळे झालेल्या दुखापतींमधून सावरत आहे. या दुखापतींमुळे त्याला या वर्षी क्रिकेट मैदानापासून दूर राहाण्याची शक्यता आहे.

आयसीसी कसोटी संघ 2022 - उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया), क्रेग ब्रेथवेट (वेस्ट इंडिज), मार्नस लॅब्यूशेन (ऑस्ट्रेलिया), बाबर आझम (पाकिस्तान),जॉनी बेअरस्टो (इंग्लंड),बेन स्टोक्स (कर्णधार) (इंग्लंड), ऋषभ पंत (यष्टीरक्षक) (ऑस्ट्रेलिया), पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया), कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका),नॅथन लायन (ऑस्ट्रेलिया), जेम्स अँडरसन (इंग्लंड).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

SCROLL FOR NEXT