MS Dhoni with Rishabh Pant Dainik Gomantak
क्रीडा

Rishabh Pant: धोनीला भेटण्यासाठी पंतने गाठली थेट दुबई! पार्टीदरम्यानचा फोटो चर्चेत

दुबईतील एका पार्टीदरम्यान धोनी आणि पंत एकत्र असतानाचा फोटो व्हायरल होतोय.

Pranali Kodre

MS Dhoni: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या नाताळाच्या सुटीची मजा त्याच्या कुटुंबाबरोबर आणि मित्रपरिवाराबरोबर दुबईत घेत आहे. त्याचे नाताळ सेलिब्रेशनदरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, दुबईतील एका नाताळाच्या पार्टीदरम्यान त्याच्याबरोबर भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतही दिसला आहे.

नुकतेच काही दिवसांपूर्वी एमएस धोनीची पत्नी साक्षी हिने दुबईतील नाताळाच्या पार्टीदरम्यानचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्यासह एमएस धोनीही दिसत असून त्याच्या शेजारी पंतही उभा आहे. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचा मित्रपरिवारही आहे.

(Rishabh Pant met MS Dhoni in Dubai during Christmas celebration)

तसेच पंतनेही धोनीबरोबरचा फोटो शेअर करत नाताळाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे त्याचे हे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंवर युजर्सने विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

दरम्यान, पंतने नुकतीच बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळली आहे. त्यानंतर तो लगेचच दुबईला पोहोचला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका नाताळाच्या दिवशीच म्हणजेच 25 डिसेंबर रोजी संपली होती.

त्याचबरोबर मंगळवारी बीसीसीआयने आगामी श्रीलंकेविरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा केलेली आहे. या दोन्ही मालिकांसाठी पंतला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. त्याला संघात स्थान न देण्याचे कारण विश्रांती आहे की त्याला वगळण्यात आले आहे, याबद्दल बीसीसीआयने स्पष्ट केलेले नाही.

मात्र, अनेकांनी त्याच्या मर्यादीत षटकांमधील खराब फॉर्ममुळे त्याला भारतीय संघातून वगळल्याचा अंदाज बांधला आहे. तर काहिंनी त्याला विश्रांती देण्यात आली असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

श्रीलंकेविरुद्ध भारताला 3 जानेवारी पासून 3 सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे, तर 10 जानेवारीपासून वनडे मालिका खेळायची आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT