Rishabh Pant Dainik Gomantak
क्रीडा

Rishabh Pant Knee Surgery: ऋषभ पंतच्या प्रकृतीसंबंधी मोठी अपडेट, शस्त्रक्रिया यशस्वी

Rishabh Pant Knee Surgery: भारताचा सुपरस्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा 30 डिसेंबर रोजी दिल्लीहून रुरकीला जात असताना अपघात झाला.

दैनिक गोमन्तक

Rishabh Pant Knee Surgery: भारताचा सुपरस्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा 30 डिसेंबर रोजी दिल्लीहून रुरकीला जात असताना अपघात झाला. यामध्ये त्याच्या कपाळाला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला डेहराडूनहून मुंबईला उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र, आता पंतच्या हवाल्याने भारतीय चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.

शस्त्रक्रिया यशस्वी

पंतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गुडघ्यावर काल मुंबईतील (Mumbai) एका खासगी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पंत वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असून त्याच्या तब्येतीत वेगाने सुधारणा होत आहे. डॉ. पार्डीवाला आणि त्यांच्या टीमने शुक्रवारी सकाळी 10.30 च्या सुमारास ही शस्त्रक्रिया केली, जी सुमारे दोन ते तीन तास चालली.

पंतचा भीषण अपघात झाला

25 वर्षीय ऋषभ पंत 30 डिसेंबरच्या सकाळी आपल्या आईला भेटण्यासाठी दिल्लीहून रुरकीला जात होता. त्यानंतर त्याची कार दुभाजकाला धडकली. यानंतर हरियाणा रोडवेजच्या बस ड्रायव्हर आणि कंडक्टरने पंतला कारमधून बाहेर काढले आणि तात्काळ रुग्णालयात नेले. पंत कारमधून बाहेर पडताच गाडीने पूर्णपणे पेट घेतला होता. दुसरीकडे, त्याच्या एमआरआय स्कॅन अहवालात कोणतीही अडचण नाही. बीसीसीआय (BCCI) सातत्याने पंतच्या संपर्कात आहे. त्याचबरोबर पंत लवकर बरा व्हावा यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत आहे.

भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळलो

ऋषभ पंत टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. तो विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. भारतीय संघाला त्याने एकट्याने ऑस्ट्रेलियात मालिका जिंकून दिली आहे. विशेष म्हणजे, पंतने भारतासाठी 33 कसोटी सामने, 30 एकदिवसीय सामने आणि 66 टी-20 सामने खेळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT