Indian Cricket Team: भारतीय संघाने 2022 मध्ये 7 कसोटी सामन्यांमध्ये भाग घेतला, त्यापैकी 4 भारताने जिंकले. त्याचबरोबर तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. 2022 मध्ये भारतासाठी 2 खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली. वर्षाच्या शेवटच्या दिवशी, बीसीसीआयने अशा दोन नावांची घोषणा केली आहे, ज्यांनी यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली. जाणून घेऊया या खेळाडूंबद्दल...
2022 मध्ये भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) चांगली कामगिरी केली. त्याने आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली. तो टीम इंडियासाठी सर्वात मोठा सामना विजेता म्हणून उदयास आला. पंतने या वर्षी भारतासाठी एकूण सात कसोटी सामने खेळले आणि दोन शतके आणि चार अर्धशतकांसह 61.81 च्या सरासरीने 680 धावा केल्या.
तसेच, 30 डिसेंबर रोजी सकाळी ऋषभ पंतचा रुरकीजवळ कार अपघात झाला, ज्यामुळे तो जखमी झाला. त्याचवेळी त्याच्या हाताला आणि पायालाही दुखापत झाली. 6 ते 8 महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे त्याच्यासाठी कठीण आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा भारताच्या घातक गोलंदाजांपैकी एक आहे, मात्र 2022 वर्षातील बहुतांश काळ तो दुखापतींनी त्रस्त होता. या कारणास्तव तो आशिया चषक आणि टी-20 विश्वचषक 2022 मध्ये सहभागी होऊ शकला नाही. पण 2022 मध्ये त्याने भारतीय संघासाठी 5 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 22 विकेट घेतल्या आहेत. त्याची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 24 धावांत 5 बळी. इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातही बुमराहने रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपद भूषवले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.