India vs South Africa | Rinku Singh 
क्रीडा

SA vs IND: सामन्यानंतर रिंकू सिंग का म्हणाला 'सॉरी', BCCI ने शेअर केला व्हिडिओ

Pranali Kodre

India vs South Africa 2nd T20I match at Gqeberha, Rinku Singh:

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात मंगळवारी टी२० मालिकेतील दुसरा सामना पार पडला. गेकेबेरा येथे झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ लुईस नियमानुसार ५ विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला असला, तरी रिंकू सिंगने केलेल्या फलंदाजीने अनेकांना प्रभावित केले. त्याने या सामन्यात त्याच्या कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले.

रिंकूने 39 चेंडूत 68 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याच्या या खेळीबद्दल त्याने भावना व्यक्त केल्या आहेत, ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

रिंकू या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून तीन विकेट्स गेल्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादव दुसऱ्या बाजूने फलंदाजी करत होता.

सूर्यकुमार आक्रमक फलंदाजी करत असताना सुरुवातीला रिंकूने संयमी खेळ केला. पण सूर्यकुमार 56 धावांवर बाद झाल्यानंतर रिंकूने आक्रमक पवित्रा घेतला आणि दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला.

दरम्यान, 19 व्या षटकात त्याने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करमच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार मारले. यातील एक षटकार त्याने इतका जोरदार मारला की स्टेडियममधील मीडिया बॉक्सची काच फुटली. याबद्दल त्याने हसत सामन्यानंतर माफीही मागितली आहे.

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रिंकू म्हणाला, 'मी बॅटिंगला गेलो, तेव्हा आधीच 3 विकेट गेल्या होत्या, त्यामुळे थोडी कठीण परिस्थिती होती. तेव्हा सूर्या भाईने हेच सांगितले की जसा खेळत आला आहेस, तसा खेळ. सुरुवातीला मी थोडा वेळ घेतला, कारण खेळपट्टी कशी आहे समजत नव्हती. थोडे चेंडू खेळल्यानंतर मी स्थिरवलो, मग शॉट्स खेळणे सोपे गेले.'

त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी रिंकूने मीडिया बॉक्सची काच फोडल्याबद्दल माफी मागतो, असेही म्हटले.

या सामन्यात 19.3 षटकात भारताने 7 बाद 180 धावा केलेल्या असताना पावसामुळे काहीवेळ खेळ थांबला. काहीवेळाने जेव्हा पुन्हा सामना सुरु झाला, तेव्हा डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेसमोर 15 षटकात 152 धावांचे आव्हान ठेवण्यात आले.

या लक्ष्याचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट्स गमावत 13.5 षटकात करत पूर्ण केला. दक्षिण आफ्रिकेकडून रिझा हेंड्रिक्सने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. तसेच मार्करमने 30 धावांची खेळी केली. तसेच अन्य फलंदाजांनी छोटेखानी खेळी करत योगदान दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT