ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) एका मुलाखतीदरम्यान शेन वॉर्नशी (Shane Warne) संबंधित एक किस्सा सांगताना भावूक झाला, त्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते आणि, अश्रूची धार लागली, यावरूनच शेन वॉर्न आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्व लक्षात येते. ते किती प्रिय होते हे दिसून येते. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज लेगस्पिनरचे 4 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने जागतिक क्रिकेटच (Cricket) नव्हे तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांनाही धक्का बसला आहे. 52 वर्षीय वॉर्नचे असे जाणे सगळ्यांसाठीच धक्कादायक होते. आणि, पॉन्टिंगसाठी याहुन दुःखद वेगळी नाही. (Ricky Ponting saddened by tragic death of Shane Warne)
दुसर्या दिवशी सकाळी वॉर्नच्या मृत्यूची बातमी मिळाल्यावर तो स्तब्ध झाल्याचे पाँटिंगने सांगितले, त्याचा माजी सहकारी आणि चांगला मित्र आता या जगात नाही यावरती विश्वास ठेवणे त्याच्यासाठी कठीण झाले. पाँटिंग म्हणाला, सकाळी जेव्हा मला ही बातमी समजली तेव्हा मला धक्का बसला. मला माझ्या मुलींना नेटबॉलसाठी घेऊन जायचे आहे हे जाणून मी काल रात्री झोपायला गेलो आणि मग अशा वेळेला सामोरे जावे लागले जे अगदीच मला खरे वाटत नव्हते. आणि आताही कदाचित ते खरे आहे असे वाटत नाही.”
ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने शेन वॉर्नचे कौतुक करताना सांगितले की, तो त्याच्यापेक्षा चांगल्या गोलंदाजा सोबत कधीच खेळले नाहीत. तो म्हणाला, “वॉर्न हा सर्वकाळातील महान खेळाडू नसला तरी सर्वकाळातील महान खेळाडूंपैकी एक म्हणूनच गणला जाईल. त्याच्यापेक्षा चांगल्या आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजासोबत मी कधीही खेळलो नाहीये. त्याने फिरकी गोलंदाजी बदलून त्यामध्ये क्रांती घडवून आणली आहे.
याआधी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट देखील केली होती, ज्यामध्ये त्याने शेन वॉर्नच्या मृत्यूवरती लिहिले होते, “याचे शब्दात वर्णन करणे मला कठीण आहे. मी 15 वर्षांचा असताना अकादमीत त्यांना पहिल्यांदा भेटलो, त्याने मला माझे उपनाव दिले. आम्ही एका दशकाहून अधिक काळ आम्ही संघमित्र होतो. सर्व चढ-उतार एकत्र सहन केले. मी आजवर महान गोलंदाजा सोबत किंवा विरुद्ध खेळाडू सोबत खेळलो आहे. तुझ्या आत्म्याला शांती लाभो. माझे विचार कीथ, ब्रिजेट, जेसन, ब्रुक, जॅक्सन आणि समर यांच्याशी आहेत."
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.