Firing Video Dainik Gomantak
क्रीडा

Firing Video: रक्ताचा खेळ! LIVE सामन्यात अंदाधुंद गोळीबार, अनेकांचा जागीच मृत्यू; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

Live Match Firing Video: अमेरिकेतील 'रोड आयलंड' (Rhode Island) राज्याला भीषण गोळीबाराच्या घटनेने हादरवून सोडले आहे.

Sameer Amunekar

अमेरिकेतील 'रोड आयलंड' (Rhode Island) राज्याला भीषण गोळीबाराच्या घटनेने हादरवून सोडले आहे. पॉटकेट येथील 'डेनिस एम. लिंच एरिना'मध्ये शालेय मुलांच्या हॉकी सामन्यादरम्यान एका माथेफिरूने गोळीबार केला. या थरारक घटनेत हल्लेखोरासह तीन जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये एका तरुण मुलीचाही समावेश असल्याची माहिती सीएनएनने दिली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

सामना सुरू असतानाच गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा दोन शालेय संघांमध्ये हॉकीचा सामना रंगला होता. प्रेक्षक आणि विद्यार्थी खेळाचा आनंद घेत असतानाच हल्लेखोराचा प्रवेश झाला.

प्राथमिक तपासानुसार, हल्लेखोर हा आपल्याच कुटुंबातील सदस्यांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने तेथे आला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गोळीबार केल्यानंतर गोंधळ उडाला आणि प्रेक्षकांनी जिवाच्या आकांतातने पळ काढला. त्यानंतर हल्लेखोराने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली.

प्रशासनाची प्रतिक्रिया

रोड आयलंडचे गव्हर्नर डॅन मॅकी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले की, "राज्य प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पॉटकेटचे महापौर ग्रेबियन आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, स्थानिक यंत्रणेला पूर्ण सहकार्य केले जात आहे." जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अमेरिकेतील 'गन कल्चर'चा पुन्हा एकदा विळखा

अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गोळीबाराच्या घटना प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहेत. काही महिन्यांपूर्वीच प्रोविडेंस येथील ब्राउन युनिव्हर्सिटीतही अशीच घटना घडली होती, ज्यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा बळी गेला होता. शाळा, विद्यापीठे आणि आता क्रीडांगणेही सुरक्षित उरली नसल्याने अमेरिकेतील शस्त्र नियंत्रण कायद्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT