Rey Mysterio Announced Retirement Dainik Gomantak
क्रीडा

Rey Mysterio Announced Retirement: WWE चाहत्यांसाठी मोठी बातमी! रे मिस्टेरियो घेणार निवृत्ती; कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात मुलाशी भिडणार?

Rey Mysterio last match date: WWE विश्वातील लोकप्रिय आणि दिग्गज रेसलर रे मिस्टेरियो याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.

Sameer Amunekar

WWE विश्वातील लोकप्रिय आणि दिग्गज रेसलर रे मिस्टेरियो याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. तब्बल ३७ वर्षांपासून रेसलिंगच्या रिंगमध्ये आपल्या खास शैलीने चाहत्यांचे मनोरंजन करणारा हा स्टार २०२७ मध्ये आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम देणार आहे. विशेष म्हणजे, त्याने निवृत्तीची तारीख आणि ठिकाणही जाहीर केले आहे. १२ जून २०२७ रोजी मेक्सिको सिटीमधील बॅनोर्ते स्टेडियममध्ये तो कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे जगभरातील WWE चाहत्यांसाठी हा भावनिक क्षण ठरणार आहे.

Survivor Series नंतर केली निवृत्तीची घोषणा

WWE Survivor Series WarGames 2026 हा इव्हेंट संपल्यानंतर रे मिस्टेरियो आपल्या भविष्याबाबत महत्त्वाची घोषणा केली. या इव्हेंटनंतर झालेल्या पोस्ट-शो कार्यक्रमात त्याने २०२७ च्या मध्यात रेसलिंगमधून निवृत्त होणार असल्याचे स्पष्ट केले. इतकेच नाही, तर आपल्या अखेरच्या सामन्यासाठी त्याने तारीख आणि ठिकाणही निश्चित केले आहे.

रे मिस्टेरियोच्या घोषणेनुसार, १२ जून २०२७ रोजी मेक्सिको सिटीतील बॅनोर्ते स्टेडियममध्ये त्याचा शेवटचा सामना होईल. हेच मैदान एस्टाडिओ अझ्टेका या नावानेही ओळखले जाते. मात्र, या दिवशी WWE कोणता विशेष कार्यक्रम आयोजित करणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. रे मिस्टेरियो दीर्घ कारकिर्दीचा गौरव करण्यासाठी WWE विशेष कार्यक्रम आयोजित करणार का, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

वयाच्या १४ व्या वर्षी रिंगमध्ये पदार्पण

रे मिस्टेरियो १९८९ मध्ये अवघ्या १४ व्या वर्षी व्यावसायिक रेसलिंगमध्ये पदार्पण केले होते. सुरुवातीला 'कोलिब्री' या नावाने त्याने रिंगमध्ये प्रवेश केला. त्यानंतर AAA, ECW आणि WCW यांसारख्या रेसलिंग कंपन्यांमध्ये त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, त्याच्या कारकिर्दीला जागतिक लोकप्रियता मिळाली ती WWE मधील कामगिरीमुळे.

२००२ मध्ये त्याने WWE मध्ये पदार्पण केले. त्याच्या वेगवान हालचाली, हवेत उडी मारून प्रतिस्पर्ध्यांवर केले जाणारे हल्ले आणि '619' या खास मूव्हमुळे तो चाहत्यांच्या पसंतीस उतरला. २०१५ मध्ये त्याने WWE सोडले होते. मात्र, २०१८ मध्ये पुन्हा एकदा कंपनीत पुनरागमन केले. त्यानंतर तो सातत्याने WWE चा भाग राहिला आहे.

अनेक चॅम्पियनशिप आणि रॉयल रंबलचा किताब

रे मिस्टेरियो आपल्या WWE कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत. त्याच्या नावावर वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप, युनायटेड स्टेट्स चॅम्पियनशिप, इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियनशिप, क्रूझरवेट चॅम्पियनशिप आणि टॅग टीम चॅम्पियनशिप यांसारखे किताब आहेत. २००६ मध्ये रॉयल रंबल सामना जिंकून त्याने कारकिर्दीतील आणखी एक मोठा विक्रम नोंदवला.

२०२३ मध्ये WWE ने त्याला हॉल ऑफ फेममध्ये स्थान देऊन त्याच्या योगदानाचा गौरव केला. विशेष म्हणजे, सक्रिय रेसलिंग कारकिर्दीत असतानाच त्याला हा सन्मान मिळाला. त्यामुळे रेसलिंग विश्वातील त्याचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित होते.

अखेरच्या सामन्यात कोणाशी भिडणार? चाहत्यांची उत्सुकता

रे मिस्टेरियो निवृत्तीच्या घोषणेनंतर आता त्याच्या अखेरच्या सामन्यात प्रतिस्पर्धी कोण असणार, याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, WWE किंवा मिस्टीरियोने अद्याप प्रतिस्पर्ध्याचे नाव जाहीर केलेले नाही. तसेच १२ जून २०२७ रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे संपूर्ण स्वरूपही स्पष्ट झालेले नाही.

मिस्टीरियोचा मुलगा डॉमिनिक मिस्टीरियो याच्यासोबत त्याचा सामना व्हावा, अशी काही चाहत्यांची अपेक्षा आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. WWE कडून आगामी काळात निवृत्ती दौऱ्याचे अधिक तपशील जाहीर होण्याची शक्यता आहे.

रेसलिंगच्या एका पर्वाचा शेवट?

रे मिस्टेरियो जवळपास चार दशकांच्या कारकिर्दीत आपल्या वेगळ्या शैलीने रेसलिंगला नवी ओळख मिळवून दिली. विशेषतः लुचा लिब्रे शैलीला जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यात त्याचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे त्याची निवृत्ती ही केवळ एका रेसलरची रिंगमधून एक्झिट नसून अनेक वर्षे त्याला पाहणाऱ्या चाहत्यांसाठी भावनिक क्षण ठरणार आहे.

आता १२ जून २०२७ रोजी मेक्सिको सिटीमध्ये होणाऱ्या त्याच्या अखेरच्या सामन्याकडे संपूर्ण रेसलिंग विश्वाचे लक्ष लागले आहे. आपल्या मायदेशात, चाहत्यांसमोर आणि एका भव्य स्टेडियममध्ये कारकिर्दीचा शेवट करण्याची संधी मिस्टीरियोला मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

POCSO Court Case: देईकरच्या जामीन अर्जावर सुनावणी; सीलबंद CCTV फुटेज पाहण्यास पॉक्सो न्यायालयाची परवानगी

Lucky Zodiac Signs: सूर्याचे नक्षत्र आणि राशी परिवर्तन ठरणार गेमचेंजर! डिसेंबरमध्ये 'या' 5 राशींच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार मोठं यश अन् पैसा

Tourist Death: कांदोळीत बनाना राईड ठरली जीवघेणी; उत्तर प्रदेशातील 54 वर्षीय पर्यटकाचा बुडून मृत्यू

Fake Medicine Case: बनावट औषध प्रकरणात डॉक्टरांना कोर्टाचा दणका; फेरतपासणीचा अर्ज 10 महिन्यांनंतर फेटाळला

उपचार करून त्याला पूर्णपणे बरं करण्यात येईल... विनोद कांबळींच्या मदतीला धावले एकनाथ शिंदे; उपचाराचा खर्च अन् मुलांच्या शिक्षणाचाही खर्च उचलणार

SCROLL FOR NEXT