Goa Ujjwala Scheme: जनतेच्या सूचनांवर काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा; 'गोवा उज्ज्वला'च्या 70 कोटींवर सवाल

Goa Congress Public Manifesto 2027: काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Goa Congress Public Manifesto 2027
Goa Ujjwala SchemeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: आगामी २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आतापासूनच तयारी सुरू केली असून, पक्षाचा ‘जन जाहीरनामा’ तयार करण्यासाठी जनतेकडून सूचना आणि शिफारसी मागवण्यात आल्या आहेत. यासाठी विशेष हेल्पलाईन आणि ईमेल सुविधा सुरू करण्यात आली आहे. नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि आकांक्षांना जाहीरनाम्यात स्थान दिले जाणार असल्याची माहिती जाहीरनामा समितीचे अध्यक्ष खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी दिली.

काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष सुनील कवठणकर, माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. प्रतीक्षा खलप आणि सरचिटणीस एव्हरसन वालेस उपस्थित होते.

Goa Congress Public Manifesto 2027
Goa Congress: गोवा विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये उमेदवारीची चुरस; 30 तारखेला अर्जांचा आकडा स्पष्ट होणार

विरियातो म्हणाले, गोमंतकीयांच्या समस्या आणि अडचणी लक्षात घेऊन आगामी सरकारने राजकीय स्वार्थापेक्षा जनतेच्या गरजा व अपेक्षांना प्राधान्य द्यावे, अशी पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे केवळ पक्षाच्या नेत्यांनी नव्हे, तर नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक जाहीरनामा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अमरनाथ पणजीकर यांची टीका

‘गोवा उज्ज्वला’ योजनेच्या निधीच्या वापराबाबत अमरनाथ पणजीकर यांनी सरकारला धारेवर धरले. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ ३० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित ७० कोटी रुपये कुठे गेले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारने याबाबत जनतेला स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Goa Congress Public Manifesto 2027
Goa Sports Director Transfer: क्रीडामंत्री तवडकर आणि संचालक गावडे यांच्यातील संघर्ष विकोपाला; बदलीच्या हालचाली सुरू?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories