Hardik Pandya vs Rohit Sharma
Hardik Pandya vs Rohit Sharma  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 Qualifier 2: मुंबईला मात देणं गुजरातसाठी सोपं नाही, रेकॉर्ड बघून पांड्याचं वाढणार टेंशन!

Manish Jadhav

MI vs GT, Qualifier 2: मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2023 चा क्वालिफायर सामना शुक्रवारी (26 मे) होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांना जिंकून अंतिम तिकीट मिळवायचे आहे, पण ते तितके सोपे नसेल.

एकीकडे गुजरातच्या संघाने चालू मोसमात जबरदस्त कामगिरी केली आहे, तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या नावावर प्लेऑफ सामन्यांमध्ये शानदार रेकॉर्ड आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये निकराची लढत पाहायला मिळणार हे मात्र नक्की.

मुंबईचे आकडे विलक्षण आहेत

हा सामना गुजरात टायटन्सच्या घरच्या मैदानावर होणार असला तरी ही आकडेवारी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) बाजूने आहे. 2017 पासून मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये एकही सामना गमावलेला नाही.

2017 मध्ये, क्वालिफायर-1 मध्ये रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून संघाचा पराभव झाला होता. मात्र, त्यानंतरही मुंबईला ट्रॉफी जिंकण्यात यश आले होते.

त्यानंतर प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्सला कोणीही हरवू शकले नाही. 2017 नंतर, मुंबई 2019, 2020 आणि चालू हंगाम 2023 मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाली आहे.

यादरम्यान संघाने 7 प्लेऑफ सामने खेळले असून सर्व जिंकले आहेत. लखनऊ सुपर जायंट्सचा 81 धावांनी पराभव करुन संघाने या मोसमातील क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट विक्रम

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्स संघ विक्रमी 5 वेळा चॅम्पियन बनला आहे. संघाची खराब कामगिरी साखळी टप्प्यातील सामन्यांमध्ये अनेकदा पाहायला मिळते, पण संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करताच अत्यंत घातक फॉर्ममध्ये येतो.

रोहितच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत 14 आयपीएल प्लेऑफ खेळले आहेत, ज्यात 11 जिंकले आहेत.

जर आयपीएल (IPL) फायनलबद्दल बोलायचे झाल्यास, मुंबईने 6 वेळा अंतिम फेरी गाठली असून 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. अशा परिस्थितीत मुंबईला हलक्यात घेण्याची चूक गुजरातसाठी मोठी ठरु शकते.

दोन्ही संघांसाठी मोठी संधी

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांना आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची उत्तम संधी आहे.

एकीकडे मुंबई इंडियन्सची नजर त्यांची 6 वी आयपीएल ट्रॉफी जिंकण्याकडे असेल, तर दुसरीकडे गुजरात संघाला अंतिम फेरी गाठून सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याची इच्छा असेल.

क्वालिफायर-2 चा विजेता 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जसोबत विजेतेपदाचा सामना खेळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT