IPL 2023: विराटला नडणाऱ्या नवीन उल हकने कोहलीसोबतच्या वादावर सोडले मौन, म्हणाला...

IPL 2023: लखनऊ सुपर जायंट्सचा स्टार वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक विराट कोहलीसोबतच्या वादानंतर टीकेला सामोरे जात आहे.
Naveen Ul Haq & Virat Kohli
Naveen Ul Haq & Virat Kohli Dainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2023: लखनऊ सुपर जायंट्सचा स्टार वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक विराट कोहलीसोबतच्या वादानंतर टीकेला सामोरे जात आहे. त्याने कितीही चांगली कामगिरी केली तरी मैदानावरील कोहलीचे चाहते त्याला त्रास देण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत.

दरम्यान, बुधवारी रात्री देखील असेच दृश्य पाहायला मिळाले, जेव्हा आयपीएल 2023 च्या एलिमिनेटर सामन्यात LSG आणि मुंबई इंडियन्स आमने-सामने होते. या सामन्यात नवीन-उल-हकने शानदार कामगिरी केली.

त्याने मुंबईच्या चार मोठ्या विकेट घेतल्या ज्यात, रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव आणि कॅमेरुन ग्रीनची नावे आहेत. असे असतानाही मैदानावर फक्त कोहली-कोहलीचाच जयजयकार ऐकू आला.

Naveen Ul Haq & Virat Kohli
IPL 2023: नोबॉलवर आऊट? टीम डेव्हिडच्या विकेटनंतर चर्चेला उधाण, पाहा Video

दुसरीकडे, या सामन्यानंतर नवीन-उल-हकला याबाबत विचारण्यात आले असता तो म्हणाला की, 'जेव्हा मैदानावर कोहली-कोहलीचा जयजयकार होत होता तेव्हा त्याला संघासाठी अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळत होते.'

तो पुढे म्हणाला की, 'बरं, मी इतर कोणत्याही गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही. मी फक्त कामगिरी अधिक चांगली कशी करता येईल याकडे लक्ष देतो. क्रिकेटप्रेमींच्या घोषणांचा किंवा कोण काय म्हणतो याचा मला काहीही फरक पडत नाही.

एक खेळाडू म्हणून तुम्हाला ते तुमच्या पद्धतीने घ्यावे लागेल. जेव्हा तुम्ही संघासाठी चांगली कामगिरी करत नसता तेव्हा चाहते तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, जेव्हा तुम्ही संघासाठी चांगली कामगिरी करता तेव्हा तेच चाहते तुमच्या नावाचा जयजयकार करतात'.

Naveen Ul Haq & Virat Kohli
IPL 2023, Eliminator: लखनऊचा सलग दुसऱ्यांदा स्वप्नभंग! मुंबईचा दणदणीत विजयासह 'क्वालिफायर-2' मध्ये प्रवेश

तसेच, विराट कोहलीसोबत (Virat Kohli) घडलेल्या या घटनेनंतर एलएसजीचा मेंटॉर गौतम गंभीरने संपूर्ण स्पर्धेत नवीन-उल-हकला पाठिंबा दिला. त्या लढतीतही तो आपल्या संघातील खेळाडूसोबत दिसला. नवीनने आता गंभीरचे वर्णन 'दिग्गज' असे केले आहे.

Naveen Ul Haq & Virat Kohli
IPL 2023 Video: नवीनचा मुंबईविरुद्ध कहर! हिटमॅनसह 4 फलंदाजांना केलं आऊट, हटके सेलिब्रेशनचीही चर्चा

टीम इंडियाचा माजी स्टार क्रिकेटपटू गौतम गंभीरबाबत बोलताना नवीन म्हणाला की, 'प्रत्येकाने आपल्या खेळाडूंच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मग मार्गदर्शक, प्रशिक्षक, खेळाडू किंवा कोणीही असो. मी माझ्या टीममधील प्रत्येक सहकाऱ्याच्या बाजूने उभा राहतो आणि मला प्रत्येकाकडून अशीच अपेक्षा आहे.

ते (गंभीर) भारताचे एक दिग्गज क्रिकेटर आहेत. त्यांनी भारतीय क्रिकेटला खूप काही दिले आहे. एक मार्गदर्शक म्हणून, प्रशिक्षक म्हणून मी त्यांचा खूप आदर करतो. यादरम्यान त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com