FC Goa Dainik Gomantak
क्रीडा

I League Tournament: 'चर्चिल ब्रदर्स'ला नमवत 'रियल काश्मीर'ची विजयी दौड कायम

श्रीनगर येथील टीआरसी मैदानावर पार पडला सामना

दैनिक गोमंतक

पणजी: माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सला आज ( सोमवारी ) आय-लीग फुटबॉल स्पर्धेत चार लढतीत तिसरा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्यांची स्थिती बिकट बनली. रियल काश्मीरने अपराजित मालिका कायम राखताना 1-0 फरकाने विजय नोंदवून गुणतक्त्यात अग्रस्थान मिळविले.

(Real Kashmir defeated Churchill Brothers in the I League football tournament)

श्रीनगर येथील टीआरसी मैदानावर झालेल्या लढतीत घाना देशाच्या इब्राहिम नुरुदीन याने 76 व्या मिनिटास केलेला गोल निर्णायक ठरला. बदली खेळाडूचे भेदक हेडिंग रियल काश्मीरला स्पर्धेतील तिसरा विजय मिळवून देण्यास पुरेसे ठरले. अन्य एका बरोबरीसह त्यांचे चार लढतीतून 10 गुण झाले असून अव्वल स्थान मिळाले आहे.

चर्चिल ब्रदर्सला तिसऱ्या पराभवामुळे अकराव्या स्थानी घसरावे लागले. चार लढतीतून त्यांच्या खाती फक्त एक गुण आहे. गोव्यातील संघाचा पुढील सामना घरच्या मैदानावर 2 डिसेंबर रोजी ऐजॉल एफसीविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT