Sachin and Arjun Tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

Video: IPL खेळणारे पहिले पिता-पुत्र! सचिन-अर्जुनची आली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Pranali Kodre

Arjun Tendulkar IPL Debut: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 5 विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यातून अर्जुन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले.

अर्जुन तेंडुलकरला आयपीएलच्या पदार्पणाची कॅप मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने प्रदान केली. अर्जुनने या सामन्यात मुंबईकडून गोलंदाजीची सुरुवातही केली. त्याने या सामन्यात २ षटके गोलंदाजी केली. यामध्ये त्याने पहिल्या षटकात 4 धावा आणि दुसऱ्या डावात 13 धावा दिल्या. पण त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.

दरम्यान, अर्जुन हा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. सचिन देखील 2008 ते 2013 दरम्यान मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळला आहे. त्याने 55 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्वही केले आहे. त्यामुळे सचिन आणि अर्जुन हे आयपीएल खेळणारी पहिली पिता-पुत्रांची जोडी ठरली आहे.

या सामन्यानंतर या दोघांनी आपली प्रतिक्रियाही दिली असून त्याचा व्हिडिओ आयपीएलच्या सोशल मीडिया हँडेलवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये अर्जुनने म्हटले आहे की 'तो खूप खास क्षण होता.ज्या संघाला मी 2008 पासून पाठिंबा देत आहे, त्या संघासाठी खेळणे खास आहे. मुंबई इंडियन्स आणि भारतीय संघाच्या कर्णधाराकडून कॅप मिळाल्याने छान वाटत आहे.'

तसेच सचिनने म्हटले आहे की 'हा माझ्यासाठी नवा अनुभव होता, कारण आत्तापर्यंत मी कधीही जाऊन त्याला खेळताना पाहिले नव्हते. मला त्याला त्याच्या खेळण्याचे, त्याला हवे ते करण्याचे स्वातंत्र्य द्यायचे होते. आजपण मी ड्रेसिंग रुममध्ये बसलो होतो, कारण मला त्याला त्याच्या योजनांपासून विचलित होऊ द्यायचे नव्हते. वेगळीच भावना होती, कारण 2008 मध्ये माझ्यासाठी पहिला हंगाम होता आणि आता 16 वर्षांनंतर तो त्याच संघासाठी खेळत आहे.'

याशिवाय सचिनने सोशल मीडियावर अर्जुनसाठी खास पोस्टही शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने लिहिले आहे की 'अर्जुन, आज तू क्रिकेटपटू म्हणून तुझ्या प्रवासातील एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. तुझा वडील म्हणून, जो तुझ्यावर प्रेम करतो आणि खेळप्रती प्रचंड प्रेम असलेला आहे, मला माहित आहे की तू खेळाला आवश्यक तो आदर देणे कायम करशील आणि खेळ तुझ्यावरही प्रेम करेल. तू इथपर्यंत पोहचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मला खात्री आहे तू पुढेही अशीच मेहनत घेशील. ही सुंदर प्रवासाची फक्त एक सुरुवात आहे. तुला शुभेच्छा.'

मुंबईने सामना जिंकला

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना वेंकटेश अय्यरच्या 104 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर 20 षटकात 6 बाद 185 धावा केल्या. या डावात मुंबई इंडियन्सकडून हृतिक शोकिनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग मुंबई इंडियन्सने 17.4 षटकात 5 विकेट्स गमावत पूर्ण केला. मुंबईकडून ईशान किशनने 25 चेंडूत 58 धावांची खेळी केली. तसेच सूर्यकुमारने 25 चेंडूत 43 धावा केल्या. कोलकाताकडून सुयश शर्माने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: व्‍हिडिओ व्‍हायरल करण्‍याची धमकी देणाऱ्या तरुणास अटक; असाहाय्य माय-लेकींवर अत्‍याचार

St Estevam Accident: 'सांतइस्तेव प्रकरण' पोहोचणार मंत्रालयात? नातेवाईकांचे देवालाही साकडे

Bhutani Infra: ‘मेगा प्रोजेक्ट’ चे अधिकार आता मुख्यमंत्र्यांकडे; 'भूतानी’ला भाजप सरकारचीच परवानगी असा काँग्रेसचा दावा

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT