IPL 2023: गोंधळच गोंधळ! एका कॅचसाठी तिघं धावले अन् शेवटी बॉलरनंच पकडला बॉल, पाहा Funny Video

Video: राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडू कॅचसाठी धावले, पण चौथ्यानंच बॉल झेलल्याची मजेशीर घटना रविवारी झालेल्या आयपीएल सामन्यात पाहायला मिळाली.
Rajasthan Royals
Rajasthan RoyalsDainik Gomantak
Published on
Updated on

Rajasthan Royals Funny Catch: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना झाला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्याच्या सुरुवातीलाच एक मजेशील झेल पाहायला मिळाला.

या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट पहिल्या षटकात गोलंदाजी करत होता. तसेच गुजरातकडून वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात केली. दरम्यान, तिसऱ्या चेंडूवर साहाने फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटला लागून सरळ वर उडाला.

Rajasthan Royals
IPL 2023: रोहित शर्मा 'या' कारणामुळे कोलकाताविरुद्ध खेळणार नाही! सूर्यकुमार मुंबईचा नवा कर्णधार

त्यावेळी तो झेल घेण्यासाठी राजस्थानचा यष्टीरक्षक कर्णधार संजू सॅमसन, ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायर हे तिघेही धावले. त्यांच्यात गोंधळ झाला आणि ते तिघेही खेळपट्टीच्या मध्ये एकमेकांना धडकले. यादरम्यान चेंडू सॅमसनच्या ग्लव्ह्जला लागून वर उडाला.

त्यावेळी बोल्टने लगेचच चपळाई दाखवली आणि या गोंधळात मात्र तो चेंडू अचूक झेलला. त्यामुळे साहाला 3 चेंडूत 4 धावा करून माघारी परतावे लागले. पण त्याचा हा झेल अनेकांना मजेशीर वाटला. या झेलाचा व्हिडिओ आयपीएलच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरही शेअर करण्यात आला आहे. यावर चाहत्यांकडून अनेक मजेशीर प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Rajasthan Royals
IPL 2023: क्लास! केएल राहुलने हवेत सूर मारत पकडला 'सुपर' कॅच, Video एकदा पाहाच

दरम्यान, गुजरातकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. तसेच शुभमन गिलने 45 धावांची खेळी केली. तसेच हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर आणि साई सुदर्शन यांनीही 20 धावांचा टप्पा पार केला. त्यामुळे गुजरातला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 177 धावा करता आल्या.

राजस्थानकडून संदीप शर्माने 2 विकेट्स घेतल्या. तसेच ट्रेंट बोल्ट, ऍडम झम्पा आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com