RCB  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2026 Points Table: लखनौ 'फ्लॉप', आरसीबी 'टॉप'! गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर कब्जा; टॉप-5 मध्ये मोठी उलथापालथ

RCB Topped IPL 2026 Points Table: आयपीएल 2026 च्या रोमांचक प्रवासात 15 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने लखनौ सुपर जायंट्सचा 5 गडी राखून पराभव करत दिमाखदार विजय मिळवला.

Manish Jadhav

IPL 2026 Points Table Today: आयपीएल 2026 च्या रोमांचक प्रवासात बुधवारी (15 एप्रिल) झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने लखनौ सुपर जायंट्सचा 5 गडी राखून पराभव करत दिमाखदार विजय मिळवला. या विजयामुळे आरसीबीने केवळ दोन गुणच कमावले नाहीत, तर थेट गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेत आपला दबदबा निर्माण केला. दुसरीकडे मात्र या पराभवामुळे लखनौला मोठा धक्का बसला असून सध्या आयपीएलमध्ये तीन प्रमुख संघांमध्ये पहिल्या स्थानासाठी काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) या हंगामात आतापर्यंत 5 सामने खेळले असून त्यापैकी 4 सामन्यांत विजय मिळवला, तर केवळ एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 8 गुणांसह आरसीबी आता गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाली. आरसीबीच्या या कामगिरीमुळे राजस्थान रॉयल्सला आपल्या स्थानावरुन खाली उतरावे लागले असून राजस्थानचा संघ 8 गुणांसह दुसऱ्या स्थानी सरकला. जरी राजस्थान आणि आरसीबीचे गुण समान असले, तरी चांगल्या धावगतीच्या जोरावर बंगळुरुने पहिले स्थान काबीज केले.

गुणतालिकेतील इतर स्थानांचा विचार करता, पंजाब किंग्स 7 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर असून ते देखील अव्वल दोन संघांना कडवे आव्हान देत आहेत. चौथ्या स्थानावर सनरायझर्स हैदराबाद आणि पाचव्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स प्रत्येकी 4 गुणांसह स्थिरावले आहेत. सहाव्या क्रमांकावर गुजरात टायटन्सचा संघ 4 गुणांसह कायम आहे. आरसीबीकडून पराभूत झालेला लखनौ सुपर जायंट्सचा संघ 4 गुणांसह सातव्या स्थानावर आहे, तर बलाढ्य मानला जाणारा चेन्नई सुपर किंग्स 5 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे.

तालिकेच्या तळाला असलेल्या संघांची चिंता वाढली असून मुंबई इंडियन्स 2 गुणांसह नवव्या, तर कोलकाता नाईट रायडर्स अवघ्या 1 गुणासह दहाव्या स्थानावर आहे. आरसीबीच्या या विजयाने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून यंदा 'ई साला कप नाम्दे'चे स्वप्न पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. आगामी सामन्यांमध्ये अव्वल तीन संघांमधील ही चुरस अधिकच वाढणार असून प्ले-ऑफच्या शर्यतीत कोण बाजी मारणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Retirement: 23 वर्षांचा प्रवास, असंख्य जागतिक रेकॉर्ड! ख्रिस्तियानो रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती; कोट्यवधी चाहत्यांचे पाणावले डोळे VIDEO

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 2.57 की 3? आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार? थकबाकीचं संपूर्ण गणित समजून घ्या

Goa Crime: दोन्ही हातांत कोयते घेऊन दहशत; कुटुंबीय, ग्रामस्थ आणि पोलिसांना धमकावणारा तरुण ताब्यात

Stray Dog Management: भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनात दिरंगाई; 8 पंचायत सचिवांवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Goa Agriculture: गोव्याचा पारंपरिक कृषी वारसा धोक्यात? नारळ प्रक्रिया आणि मीठ उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारकडे साकडे

SCROLL FOR NEXT