Du Plessis Dainik Gomantak
क्रीडा

फाफ डू प्लेसिस ठरला IPL 2022 चा दुसरा सर्वात धडाकेबाज कर्णधार

Faf du Plessis IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने आपल्या नावावर एक खास कामगिरी केली आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 8 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरूने गुजरातचा पराभव केला. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने (Faf du Plessis) 44 धावा केल्या. डु प्लेसिसने एक विशेष कामगिरी आपल्या नावावर केली आहे. या मोसमात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. डू प्लेसिसचा संघ आरसीबीने आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.

IPL 2022 मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत KL राहुल पहिल्या क्रमांकावर आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार राहुलने आतापर्यंत 537 धावा केल्या आहेत. तर डू प्लेसिस 443 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 96 धावा आहे. IPL 2022 मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत हार्दिक पांड्या तिसऱ्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार पांड्याने 413 धावा केल्या आहेत.

विशेष म्हणजे गुजरातविरुद्धचा सामना जिंकून बंगळुरूचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. आरसीबीने या मोसमात 14 सामने खेळले आणि 8 जिंकले. तर 6 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या विजयानंतर संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अबाधित राहिल्या आहेत. त्याचा नेट रनरेट चांगला नसला तरी. RCB चा नेट रन रेट -0.253 आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: कर्नाटकातील कोप्पल येथील स्पर्धेसाठी गोवा संघ रवाना

SCROLL FOR NEXT