Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2024: 16 वर्षे, पण किंग एकच! RCB ची विराट कोहलीसाठी स्पेशल पोस्ट

RCB post For Virat Kohli: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने विराट कोहलीसाठी नुकतीच एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

Pranali Kodre

RCB post For Virat Kohli

इंडियन प्रीमयर लीग 2024 स्पर्धा दहा दिवसातच म्हणजेच 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना दिसणार आहे.

दरम्यान, विराट गेली 16 वर्षे बेंगलोरकडूनच आयपीएल खेळत आहे. त्याला आयपीएलच्या पहिल्या हंगामाच्या लिलावात बेंगलोरने संघात घेतले होते, तेव्हापासून तो संघात कायम खेळत आहे.

विराटला अवघ्या 12 लाखात बेंगलोरने संघात घेतले होते. पण त्यानंतर त्याने नेहमीच बेंगलोरसाठी चांगली कामगिरी केली. तो असा एकमेव खेळाडू आहे, जो आयपीएलच्या आत्तापर्यंतच्या सर्व हंगामात एकाच संघात खेळत आहे.

त्यामुळे त्याच्या 16 वर्षांच्या प्रवासाचे सेलिब्रेशन म्हणून बेंगलोरने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

बेंगलोरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक पोस्टर दिसत असून त्यात विराट पाठ करून उभा असून त्याच्यासमोर अनेक टीव्ही आहेत, ज्यात त्याचे बेंगलोरकडून खेळतानाचे खास क्षण दिसत आहेत. या पोस्टवर लिहिले आहे की '16 वर्षे, 1 राजा' (16 Years 1 King).

विराटने 2011 ते 2021 दरम्यान बेंगलोरचे नेतृत्वही केले असून त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 2016 मध्ये बेंगलोरने अंतिम सामन्यातही प्रवेश केला होता. परंतु, त्यांना अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता.

त्याच्यानंतर संघाचे नेतृत्व फाफ डू प्लेसिसकडे देण्यात आले. विराटने 140 सामन्यात बेंगलोरचे नेतृत्व करताना 64 विजय आणि 69 पराभव स्विकारले.

विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज आहे. तो आयपीएलमध्ये 7000 धावांचा टप्पा पार करणाराही पहिलाच खेळाडू आहे. त्याने आयपीएलमध्ये 237 सामन्यांत 37.25 च्या सरासरीने 7263 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 7 शतकांचा आणि 50 अर्धशतकांचा समावेश आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणाराही खेळाडू आहे.

दरम्यान, असे असले तरी अद्याप विराटला आयपीएल विजेतेपदाची प्रतिक्षा आहे. यंदा आयपीएल 2024 मध्ये बेंगलोर संघ पहिला सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 22 मार्च रोजी चेन्नईमध्ये खेळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live Updates: अवैध वास्तव्य प्रकरणी मांद्रे पोलिसांकडून युगांडाच्या नागरिकाला अटक

Goa Accidental Death: 192 दिवसांत 143 मृत्‍यू! गोव्यात नेमकं चाललंय काय? 45% बळी युवावर्गाचे

Goa: नोकरीचे आमिष देऊन आणले गोव्यात, केले लैंगिक शोषण; केनियाच्या पीडितेची सुटका; नुकसानभरपाई मंजूर

Goa Politics: 40 आमदारांत ‘मगो’ असेल की नाही, हे जनताच ठरवेल! ‘मगो’ समर्थकांचा हल्लाबोल; सरदेसाईंच्या विधानाचा निषेध

Margao Master Plan: मडगावचा ‘मास्टर प्लॅन’ काहींचे ‘निवृत्ती पॅकेज’! सरदेसाईंचा आरोप; लाेकांचा आराखडा बनवण्‍याचे आश्‍वासन

SCROLL FOR NEXT