Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli in IPL: किंग कोहलीने फिफ्टी ठोकत घातला विक्रमांचा रतीब! IPL मध्ये 'हा' कारनामा करणारा पहिलाच

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून विराट कोहलीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विक्रमी अर्धशतक केले आहे.

Pranali Kodre

Virat Kohli Record in IPL: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना झाला. या सामन्यात खेळतना बेंगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बेंगलोरकडून विराटने 46 चेंडूत 55 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार मारले. याच खेळीदरम्यान विराटने आयपीएलमध्ये 7000 धावा पूर्ण केल्या आहेत.

तो आयपीएलमध्ये 7000 धावा करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा कारनामा कोणालाही करता आलेला नाही. विराटच्या आता आयपीएलमध्ये 233 सामन्यांमध्ये 7043 धावा झाल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटूंच्या यादीत विराटच्या पाठोपाठ शिखर धवन आहे, त्याने 6536 धावा केल्या आहेत.

आयपीएल 2023 मध्ये 400 धावा पार

तसेच विराटने आयपीएल 2023 हंगामात 400 धावांचाही टप्पा पार केला असून त्याने आयपीएल हंगामात 400 धावांचा टप्पा पार करण्याची त्याची ही 9 वी वेळ आहे. त्यामुळे सर्वाधिक आयपीएल हंगामात 400 धावांचा टप्पा पार करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत त्याने सुरेश रैना आणि शिखर धवनची बरोबरी केली आहे. या दोघांनीही 9 आयपीएल हंगामांमध्ये 400 धावांचा टप्पा पार केला आहे.

पन्नासावे अर्धशतक

विराटचे आयपीएलमधील पन्नासावे अर्धशतकही ठरले आहे. तो असा कारनामा करणारा दुसराच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये 50 अर्धशतकांचा टप्पा पार केला होता. वॉर्नरने आयपीएलमध्ये 59 अर्धशतके केली आहे. विशेष म्हणजे विराटने आयपीएलमध्ये 5 शतकेही केली आहेत.

दिल्लीविरुद्धही मोठे विक्रम

तसेच विराटने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 1000 धावाही पूर्ण केला आहे. त्याचबरोबर त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचे दहाव्यांदा 50 धावांटा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे एकाच संघाविरुद्ध आयपीएलमध्ये दहाव्यांदा 50 धावांचा टप्पा पार करणारा तो पहिला भारतीय खळाडूही ठरला.

बेंगलोरकडून लोमरोरचेही अर्धशतक

दरम्यान शनिवारी झालेल्या सामन्यात विराट व्यतिरिक्त महिपाल लोमरोरनेही अर्धशतकी खेळी केली. त्याने 29 चेंडूत नाबाद 54 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्याचबरोबर कर्णधार फाफ डू प्लेसिसने 32 चेंडूत 45 धावांची खेळी केली. त्यामुळे बेंगलोरने 20 षटकात 4 बाद 181 धावा उभ्या केल्या.

दिल्लीकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. याशिवाय खलील अहमद आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT