Ravindra Jadeja | MS Dhoni
Ravindra Jadeja | MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

Ravindra Jadeja - MS Dhoni: जड्डूचे धोनीबरोबर वाद? दिल्लीविरुद्धच्या मॅचनंतरचा Video आला समोर, ट्वीटचीही चर्चा

Pranali Kodre

Ravindra Jadeja's cryptic Tweet: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. पण अशातच एक धक्कादायक चर्चा सुरू झाली आहे. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने शनिवारी (20 मे) दिल्ली कॅपिटल्सला 77 धावांनी पराभूत केल. त्याचबरोबकच प्लेऑफमध्येही प्रवेश निश्चित केला.

पण या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी आणि अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा यांच्यात वाद झाल्याच्या चर्चा आहेत. त्यातच जडेजाने रविवारी केलेले रहस्यमयी ट्वीटचीही बरीच चर्चा होत आहे.

झाले असे की दिल्ली विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर लगेचच धोनी आणि जडेजा मैदानातून बाहेर जात असताना चर्चा करताना दिसले. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की सुरुवातीला धोनी जडेजाच्या खांद्यावर हात टाकून काहीतरी सांगत आहे.

यानंतर काहीवेळात जडेजा थांबतो, त्यानंतर पुन्हा त्यांच्यात चर्चा सुरू झाली. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून काहीतरी खूप गंभीर चर्चा सुरू असल्याचे समजून येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावेळी धोनी आणि जडेजा यांच्यात मदभेद झाल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे यावेळी खरंच धोनी आणि जडेजा यांच्यात वाद झाले का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

त्यातच रविवारी जडेजाने केलेल्या ट्वीटने या चर्चांना आणखी उधाण आले आहे. जडेजाने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात 'कर्माचे फळ मिळतेच, लवकर नाही मिळालं, तरी उशीरा का होईना पण मिळते.' अशा अर्थाचे वाक्य लिहिलेले आहे.

तसेच या फोटोला जडेजाने नक्कीच असे कॅप्शनही टाकले आहे. धोनीबरोबरचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी जडेजाने अशाप्रकारचे ट्वीट केल्याने अनेकांनी चेन्नई संघात सर्वकाही अलबेल आहे की नाही, याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.

गेल्यावर्षीही मतभेदाची चर्चा

दरम्यान, जडेजाचे चेन्नई संघाबरोबरील मतभेदाची चर्चा गेल्यावर्षीही झाली होती. आयपीएल 2022 च्या हंगामापूर्वी धोनीने सीएसकेचे कर्णधारपद जडेजाकडे सोपवले होते. मात्र, सुरुवातीपासूनच त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईची कामगिरी खालावली आणि जडेजाचे वैयक्तिक कामगिरीही खालावली होती.

त्यानंतर त्याने पहिल्या 8 सामन्यांनंतर या नेतृत्वपदाचा त्याग करत पुन्हा धोनीकडे कर्णधारपद सोपवले. या सर्व घटनांदरम्यान जडेजा आणि सीएसके फ्रँचायझीमध्ये दरी निर्माण झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. तसेच अनेक रिपोर्ट्सनुसार जडेजाने हॉटेल रूमही सोडली होती. तो त्या हंगामातील अखेरचे काही सामने दुखापतीमुळे खेळला नव्हता.

त्यावेळी अनेक रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आलेले की त्याला त्यावेळी निर्माण झालेल्या वादामुळे खेळायचे नव्हते. इतकेच नाही, तर अशीही चर्चा रंगली होती की आयपीएल 2023 पूर्वी जडेजाला सीएसके संघ मुक्त करेल.

पण नंतर धोनीने मध्यस्थी केली आणि त्याने जडेजाबरोबर चर्चा केली होती. त्याचबरोबर रिपोर्ट्सनुसार धोनीने केलेल्या या चर्चेमुळे जडेजा आणि सीएसके यांच्यातील संबंध सुधारण्यात मदत झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

OpenAI ची मोठी तयारी, ChatGPT नंतर सर्च इंजिन करु शकते लॉन्च; Google ला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT