Ravindra Jadeja and Rivaba Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

Rivaba Jadeja: 'हॅलो MLA...' रवींद्र जडेजाची बायकोसाठी स्पेशल पोस्ट

भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजाने गुजरात विधानसभा निवडणूकीत विजय मिळवल्याबद्दल पत्नीचे अभिनंदन केले आहे.

Pranali Kodre

गुजरात विधानसभा निवडणूकीचा गुरुवारी निकाल लागला. या निकालात भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा देखील निवडणूकीच्या रिंगणात होत्या. दरम्यान, त्यांचा या निवणूकीत विजय झाला आहेत. त्यामुळे आता रवींद्र जडेजाने पत्नीचे कौतुक केले आहे.

रिबावा यांनी जामनगरमध्ये निवडणूक लढवली होती. दरम्यान त्यांना 88 हजारांहून अधिक मतं मिळाली. त्यांच्या विरुद्ध उभे असणाऱ्या आम आदमी पक्षाचे करशनभाई यांना ३४ हजारांहून अधिक मतं मिळाली, तर काँग्रेसचे बिपेंद्रसिंग जडेजा यांना २३ हजारांच्या जवळपास मतं मिळाली.

(Ravindra Jadeja special post for wife)

त्यामुळे रिवाबा या मोठ्या ५० हजारांपेक्षाही अधिक मतांच्या फरकाने निवडणून आल्या. याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

त्याने त्याच्या पोस्टमध्ये गुजराती भाषेत संदेश लिहिला आहे. त्याने लिहिले आहे की 'हॅलो आमदार, तू याला खरंच पात्र होतीस. जामनगरचे नागरीक जिंकले आहेत. मी त्या सर्व नागरिकांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. जामनगरमधील काम नक्कीच चांगले असेल.'

रवींद्र जडेजा त्याच्या पत्नीच्या निवडणूकीच्या प्रचारातही सहभागी झाला होता. त्याने अनेकदा याबद्दल पोस्टही केल्या होत्या.

दरम्यान, जडेजा सध्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर आहे. पण, त्याची भारताच्या आगामी बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात निवड झालेली आहे. त्यामुळे आता तो ही मालिका खेळणार की नाही, हे पाहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT