Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

Ravindra Jadeja: बांगलादेश दौऱ्यातून रवींद्र जडेजा बाहेर, या खेळाडूला मिळाली संधी

Ravindra Jadeja: न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. जिथे टीम इंडियाला दोन कसोटी मालिका खेळायच्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Ravindra Jadeja: न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. जिथे टीम इंडियाला दोन कसोटी मालिका खेळायच्या आहेत. टीम इंडियाला 3 वनडे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. आता त्याच्या जागी एका स्टार खेळाडूला संधी मिळाली आहे.

रवींद्र जडेजा बाद

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे बांगलादेश दौऱ्यातून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे जडेजा 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतही खेळू शकला नाही. आता त्याच्या जागी शाहबाज अहमदला संधी देण्यात आली आहे. शाहबाज अहमद सध्या फॉर्ममध्ये आहे.

आयपीएलमध्ये ताकद दाखवली

शाहबाज अहमदने आयपीएल 2022 मध्ये अप्रतिम कामगिरी केली, ज्याचे फळ त्याला आता मिळाले आहे. आयपीएल (IPL) 2022 मध्ये त्याने आरसीबीसाठी 16 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने चार विकेट घेतल्या. त्याचवेळी त्याने या 16 सामन्यांमध्ये 219 धावा केल्या. अहमदने 27.38 च्या सरासरीने या धावा केल्या आणि त्याचा स्ट्राइक रेट 120.99 होता.

बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा, केएल राहुल), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (डब्ल्यूके), इशान किशन (डब्ल्यूके), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

SCROLL FOR NEXT