Team India X/BCCI
क्रीडा

SA vs IND: जड्डू-मुकेशचं पुनरागमन? कोणाला मिळू शकतो डच्चू, पाहा भारताची दुसऱ्या कसोटीसाठी संभावित 'प्लेइंग-11'

India Predicted XI: दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनला बुधवारपासून खेळवला जाणार आहे.

Pranali Kodre

South Africa vs India, 2nd Test at Cape Town:

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील अखेरचा कसोटी सामना 3 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान रंगणार आहे. हा भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील कसोटी मालिकेचा दुसरा आणि निर्णायक सामना असणार आहे. हा सामना केपटाऊनला होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे.

या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज आवेश खानला काहीदिवसांपूर्वीच भारतीय संघाशी जोडण्यात आले आहे. याशिवाय शार्दुल ठाकूरलाही खांद्याला दुखापत झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, रविंद्र जडेजा पहिल्या सामन्यात पाठीच्या दुखापतीमुळे खेळला नव्हता. मात्र, दुसऱ्या कसोटीपूर्वी तो सरावासाठी परतला होता. तसेच पूर्ण तंदुरुस्त झाल्याचीही माहिती समोर आली होती.

त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटीसाठी अनुभवी फिरकीपटू आर अश्विनच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते. जडेजा फिरकी गोलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीत महत्त्वाचे योगदान देण्याची क्षमता ठेवतो.

तसेच पहिल्या सामन्यातून कसोटी पदार्पण केलेल्या प्रसिध कृष्णालाही दुसऱ्या सामन्यातून वगळले जाऊ शकते. त्याला पहिल्या कसोटीत फारशी छाप पाडता आली नव्हती. त्याच्या जागेवर संघात असलेल्या मुकेश कुमारला संधी दिली जाऊ शकते. यापूर्वी मुकेशने भारताकडून खेळलेल्या सामन्यांमध्ये प्रभाव पाडला आहे.

त्याचबरोबर सरावादरम्यान शार्दुलच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. पण जर त्याची दुखापत गंभीर नसेल, तर तो प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम राहण्याची दाट शक्यता आहे.

मात्र, जर तो खेळला नाही, तर प्रसिध कृष्णाला कायम केले जाऊ शकते आणि मुकेशलाही संधी दिली जाऊ शकते किंवा प्रसिध ऐवजी मुकेशला, तर शार्दुलच्या जागेवर आवेशला संधी दिली जाऊ शकते.

गोलंदाजीतील या बदलांशिवाय भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. भारताच्या गोलंदाजी फळीत अनुभवी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज कायम राहू शकतात.

त्याचबरोबर फलंदाजी फळी फलंदाजी सामन्यातीलच कायम राहू शकते. सलामीला कर्णधार रोहित शर्मासह युवा यशस्वी जयस्वाल उतरू शकतो, तर मधल्या फळीत शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर कायम राहू शकतात.

भारतासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान

दक्षिण आफ्रिकेने या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात डावाने विजय मिळवला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिका मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडीवर आहे.

याचमुळे भारताला मालिका जिंकण्याची संधी नाही, मात्र जर भारताने दुसरा सामना जिंकला, तर मालिकेत बरोबरी होऊ शकते. तसेच जर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत विजय मिळवला किंवा हा सामना अनिर्णित राहिला, तर दक्षिण आफ्रिका मालिका जिंकेल.

दुसऱ्या कसोटीसाठी भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन -

  • रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर/आवेश खान, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

Goa Island: बेटे आमची, गोव्याला देणार नाही; मालकीसाठी धडपडणाऱ्या कर्नाटकची कोलांटी उडी,केवळ माजाळीजवळील बेटाबाबत वाद

Goa Amar Bandekar Case: किरकोळ कारणावरून हत्या, आता न्यायालयात हिशेब! तिघांविरुद्ध खुनाचा खटला चालणार, दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला

IPL 2026: Believe Mumbai Indians! 'हिटमॅन'च्या मुंबई इंडियन्सला अजूनही प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची संधी; 'असा' आहे क्वालिफिकेशनचा फॉर्म्युला

SCROLL FOR NEXT