Team India Dainik Gomantak
क्रीडा

WTC Final 2023: आधी कहर केला.. आता दहशत निर्माण करणार, 'या' धाकड खेळाडूने कांगारुंची उडवली झोप!

WTC Final 2023: आधी ज्याने कहर केला आणि आता तोच क्रिकेटर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दहशत निर्माण करेल.

Manish Jadhav

WTC Final 2023: आधी ज्याने कहर केला आणि आता तोच क्रिकेटर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दहशत निर्माण करेल. भारतीय क्रिकेट संघात या खेळाडूच्या अचानक प्रवेशामुळे ऑस्ट्रेलियन संघात खळबळ उडाली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल (लंडन) मैदानावर खेळवला जाईल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलसाठी टीम इंडियामध्ये असा धोकादायक खेळाडू दाखल झाला आहे, जो एकटा कांगारुंकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी हिरावून घेऊ शकतो.

पूर्वी कहर केला.. आता दहशत निर्माण होईल

टीम इंडियाच्या (Team India) या खेळाडूमध्ये संपूर्ण सामना एकट्याने फिरवण्याची ताकद आहे. भारताच्या या मॅच विनरने नुकतीच आपल्या संघासाठी आयपीएल 2023 ची ट्रॉफी जिंकली आहे. आता त्याचे पुढील लक्ष्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी जिंकण्याचे आहे.

टीम इंडियाचा हा मॅच विनर दुसरा कोणी नसून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील अव्वल खेळाडू रवींद्र जडेजा आहे.

अलीकडेच, जडेजाने गुजरात टायटन्स विरुद्ध आयपीएल 2023 फायनलमध्ये सामन्याच्या शेवटच्या दोन चेंडूंमध्ये 10 धावा ठोकून चेन्नई सुपर किंग्जला अशक्य दिसणारा विजय मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल विजेतेपदावर नाव कोरले.

WTC फायनलमध्ये खेळणाऱ्या या भारतीयामुळे ऑस्ट्रेलिया दहशतीत!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये रवींद्र जडेजावर सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याच्यावर फिनिशरची भूमिका बजावण्याचीही जबाबदारी असेल. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये जडेजाही आपल्या किलर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने कहर करेल.

एकदिवसीय क्रिकेट, कसोटी क्रिकेट आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, रवींद्र जडेजाने आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियासाठी अनेक सामने जिंकले आहेत. जडेजाच्या आगमनाने ऑस्ट्रेलियन संघात घबराटीचे वातावरण आहे.

रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आपली षटके खूप वेगाने पूर्ण करतो, ज्यामुळे विरोधी फलंदाज अनेक वेळा भांबावून जातात.

हा भारतीय खेळाडू WTC फायनलमध्ये कहर करेल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये रवींद्र जडेजावर सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याच्यावर फिनिशरची भूमिका बजावण्याचीही जबाबदारी असेल. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये जडेजाही आपल्या किलर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने कहर करेल.

एकदिवसीय क्रिकेट, कसोटी क्रिकेट आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, रवींद्र जडेजाने आपल्या दमदार फलंदाजीने टीम इंडियासाठी अनेक सामने जिंकले आहेत. जडेजाच्या आगमनाने ऑस्ट्रेलियन संघात घबराटीचे वातावरण आहे.

रवींद्र जडेजाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आपली षटके खूप वेगाने पूर्ण करतो, ज्यामुळे विरोधी फलंदाज अनेक वेळा भांबावून जातात.

टीम इंडियाला अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले आहेत

रवींद्र जडेजाने 64 कसोटी सामन्यात 264 विकेट घेतल्या आहेत आणि 2658 धावाही केल्या आहेत. रवींद्र जडेजाने 174 एकदिवसीय सामन्यांमध्ये 191 आणि 64 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 51 बळी घेतले आहेत.

रवींद्र जडेजाने एकदिवसीय सामन्यांमध्ये 2526 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 457 धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजाने 226 आयपीएल सामन्यात 152 विकेट घेतल्या असून 2692 धावाही केल्या आहेत. रवींद्र जडेजा फलंदाजी, गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही महत्त्वाचे योगदान देतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT