Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

काहीतरी शिजतंय....जडेजाने इंस्टावरुन डिलीट केल्या CSKच्या सर्व पोस्ट, धोनीलाही दिल्या नाही शुभेच्छा

जडेजा आणि CSK ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांना आधीच अनफॉलो केले आहे

दैनिक गोमन्तक

रवींद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये (CSK) सर्व काही ठीक आहे असे म्हणता येणार नाही. कारम जडेजाचे तरी असे काही लक्षणे दिसत नाही. जडेजाने गेल्या 3 वर्षातील चेन्नई सुपर किंग्जशी संबंधित सर्व पोस्ट त्याच्या इंस्टाग्रामवरून हटवल्या आहेत. तेव्हापासून जडेजा आणि आयपीएल फ्रँचायझी सीएसके यांच्यातील नात्यात दुरावा वाढला असून भविष्यात दोघांचे मार्ग वेगळे असू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. जडेजा आणि CSK ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांना आधीच अनफॉलो केले आहे आणि आता अष्टपैलू खेळाडूने चेन्नई सुपर किंग्जशी संबंधित सर्व पोस्ट काढून टाकल्या आहेत. (CSK Ravindra jadeja controversy)

अशा परिस्थितीत जडेजा आणि सीएसके संघ व्यवस्थापन यांच्यातील संबंध बिघडले असल्याचे चाहत्यांनाही वाटू लागले आहे. महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) दरवर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या जडेजाने यावेळी आपल्या जुन्या मित्राला म्हणजे धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत.

जडेजा 2012 मध्ये चेन्नई सुपर किंग्जशी संबंधित होता आणि तेव्हापासून या संघासाठी तो खेळत होता. गेल्या 10 वर्षांत त्याने CSK सोबत 2 IPL विजेतेपदेही जिंकली. IPL 2022 च्या काही दिवस आधी, महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर 33 वर्षीय जडेजाला 4 वेळा चॅम्पियन टीम चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधार बनवण्यात आले होते. पण, अचानक दिलेली कर्णधारपदाची जबाबदारी जडेजाला नीट सांभाळता आली नाही. त्याच्या नेतृत्वाखाली गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने खराब कामगिरी केली. आणि संघ एकामागून एक सामने हरत राहिला. त्याच्या नेतृत्वाखाली CSK ने 8 पैकी फक्त 2 सामने जिंकले.

जडेजाने आयपीएलच्या मध्यातच कर्णधारपद सोडले होते

दबावामुळे जडेजाचा स्वतःचा खेळही बिघडला. त्याने 10 सामन्यात 19 च्या सरासरीने केवळ 116 धावा केल्या आणि फक्त 5 विकेट घेतल्या. यानंतर त्याने हंगामाच्या मध्यातच संघाचे कर्णधारपद सोडले आणि धोनी पुन्हा कर्णधार झाला. तेव्हापासून जडेजा आणि CSKचं संबध बिघडत गेले. आणि आता हा अष्टपैलू खेळाडू संघ सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगत आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघाचा उपकर्णधार बनल्याबद्दल सीएसकेने अलीकडेच जडेजाचे त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अभिनंदन केले. पण, जडेजाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सीएसकेशी संबंधित पोस्ट हटवून वाद पुन्हा पेटवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: सीबीडीटीच्या आरोपींना सशर्त जमीन मंजूर

Panaji Smart City: पणजीत नागरिकांच्या जीवाशी खेळ! खोदकाम सुरू; पण फलक नाहीत; दुचाकीस्वारांना धोका

Tribal Reservation Bill: आदिवासी विधेयकावर लोकसभेत होणार चर्चा; राजकीय प्रतिनिधित्वाला मिळणार बळकटी; तानावडेंनी दिली माहिती

Sonu Nigam At IFFI: 'आसमान से आया फरिश्ता..'; सोनू-अनुराधाची रफींना आदरांजली, रसिक मंत्रमुग्ध

Goa Cabinet: फडणवीस कि पुन्हा शिंदे? महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या पेचामुळे गोवा मंत्रिमंडळातील बदल खोळंबला

SCROLL FOR NEXT