Kamran Akmal Goat: पाकिस्तानचा विकेटकीपर फलंदाज कामरान अकमल (kamran akmal) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कामरान अकमलच्या घरातून त्याचा बकरा चोरीला गेला आहे. हा बकरा येणाऱ्या बकरी ईद-उल-अजहा (eid ul adha 2022) निमित्त खरेदी करण्यात आला होता, मात्र दोन दिवसांपूर्वी तो चोरीला गेला. यावर्षी 10 जुलै रोजी बकरी-ईद साजरी होणार आहे. (Bakra Eid 2022)
अकमलच्या कुटुंबीयांनी एक दिवस अगोदर सहा बोकड कुर्बानीसाठी आणले होते. लाहोरमधील त्याच्या खासगी हाउसिंग सोसायटीबाहेर ते एकत्र बांधले गेले. बकऱ्यांचे रक्षण करणारा नोकर झोपला असताना पहाटे तीनच्या सुमारास ही चोरी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
चोरीला गेलेल्या बकऱ्याची किंमत सर्वात जास्त
अकमलचे वडील मोहम्मद अकमल यांच्या म्हणण्यानुसार, चोरी गेलेला बोकड या सहा बकऱ्यांपैकी सर्वात चांगला होता आणि त्याची किंमत 90,000 रुपये होती. या बोडकंचा लवकरच शोध घेण्यात येईल आणि दोषींना गृहनिर्माण सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांकडून लवकरच पकडले जाईल, असे आश्वासन क्रिकेटपटूच्या कुटुंबीयांना देण्यात आले आहे.
पीएसएलपूर्वीही तो वादात सापडला होता
यंदाच्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) हंगामापूर्वीच कामरान अकमल प्रसिद्धीच्या झोतात आला होता. पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2022 पूर्वी PCB ने काही खेळाडूंच्या श्रेणींमध्ये बदल केला होता. यादरम्यान कामरान अकमलची डायमंडवरून गोल्ड कॅटेगरीत डिमोट करण्यात आली होते. पण मसुद्यादरम्यान पेशावर झल्मीने त्याची सुवर्ण श्रेणीत न करता रौप्य गटात निवड केली. अकमलने नंतर फ्रेंचायझीशी चर्चाही केली होती.
कामरान अकमलचा आंतरराष्ट्रीय विक्रम
कामरान अकमलने पाकिस्तानसाठी 53 कसोटी, 157 एकदिवसीय आणि 58 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. कसोटी सामन्यांमध्ये कामरानने 30.79 च्या सरासरीने 2648 धावा केल्या, ज्यात सहा शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 26.09 च्या सरासरीने 3236 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटने पाच शतके आणि दहा अर्धशतके झळकावली. याशिवाय, त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 21 च्या सरासरीने 987 धावा केल्या, ज्यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.