Ravichandran Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

ICC Test Rankings: टीम इंडियाच्या 'या' खेळाडूने रचला इतिहास, ICC कसोटी क्रमवारीत ठरला नंबर-1 गोलंदाज

Latest ICC Test Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नवीन कसोटी गोलंदाजी क्रमवारी (ICC Test Rankings) जाहीर केली आहे.

Manish Jadhav

Latest ICC Test Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नवीन कसोटी गोलंदाजी क्रमवारी (ICC Test Rankings) जाहीर केली आहे. या क्रमवारीत टीम इंडियाचा एक खेळाडू नंबर-1 कसोटी गोलंदाज बनला आहे.

या भारतीय गोलंदाजाने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनकडून अव्वल गोलंदाजाचा मुकुट हिसकावून घेतला आहे.

हा खेळाडू नुकताच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता.

हा खेळाडू कसोटीत नंबर-1 गोलंदाज ठरला

टीम इंडियाचा (Team India) अनुभवी फिरकीपटू आर अश्विन आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे.

36 वर्षीय आर अश्विनने 2015 मध्ये प्रथम क्रमांक 1 क्रमांकाचा कसोटी गोलंदाज होण्याचा मान मिळवला होता आणि तेव्हापासून अनेक वेळा तो अव्वल स्थानावर परतला आहे.

ताज्या कसोटी क्रमवारीत अश्विनचे ​​869 रेटिंग गुण आहेत. तर जेम्स अँडरसनचे आता 859 रेटिंग गुण आहेत.

टीम इंडियाच्या मालिका विजयाचा हिरो होता अश्विन

टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केली. अश्विन हा या मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज होता.

त्याने 4 सामन्यात एकूण 25 बळी घेतले आणि बॅटने 86 धावांचे योगदान दिले. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळताना अश्विनने संपूर्ण मालिकेत दोनदा 25 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. यासह अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.

याशिवाय, दोन्ही देशांतील एकाही गोलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही. 2013 मध्येही अश्विनने चार कसोटी सामन्यात 29 विकेट घेतल्या होत्या.

आर अश्विनचे ​​चमकदार आकडे

आर अश्विनने टीम इंडियासाठी आतापर्यंत 92 कसोटी सामने खेळले आहेत. आर अश्विनने या सामन्यांमध्ये एकूण 474 विकेट घेतल्या आहेत.

तो भारताचा कसोटीतील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. आर अश्विनने टीम इंडियासाठी 113 वनडे आणि 65 टी-20 सामनेही खेळले आहेत. आर अश्विनने वनडेमध्ये 151 आणि टी-20 मध्ये 72 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT