Ravichandran Ashwin and James Anderson Dainik Gomantak
क्रीडा

Ind vs Eng: अवघ्या 10 विकेट्सची गरज... अश्विन आणि अँडरसन रचणार इतिहास; भारत-इंग्लंड मालिकेत मोठ्या रेकॉर्डची प्रतिक्षा

Ravichandran Ashwin and James Anderson: आगामी कसोटी मालिकेत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यांच्यावर सर्वांचे लक्ष असेल.

Manish Jadhav

India vs England: टीम इंडिया सध्या अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. अफगाणिस्तान मालिका संपल्यानंतर भारताला इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. उभय संघांमधील पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून हैदराबाद येथे खेळवला जाणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या चालू हंगामाच्या दृष्टीने भारत-इंग्लंड मालिका खूप महत्त्वाची आहे.

अश्विन-अँडरसन मोठा रेकॉर्ड करु शकतात

दरम्यान, आगामी कसोटी मालिकेत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यांच्यावर सर्वांचे लक्ष असेल. हे दोन्ही महान खेळाडू कसोटीत मोठे टप्पे गाठण्याच्या अगदी जवळ आहेत. विशेष म्हणजे, इतिहास रचण्यासाठी दोघांना 10-10 विकेट्सची गरज आहे.

खरे तर, जेम्स अँडरसन 700 कसोटी बळी घेण्याच्या पराक्रमापासून फक्त 10 विकेट दूर आहे. तर अश्विनला 500 कसोटी बळींचा टप्पा गाठण्यासाठी 10 विकेट्सची गरज आहे. आर. अश्विनने आतापर्यंत 95 कसोटी सामन्यांमध्ये 490 विकेट घेतल्या आहेत. या काळात अश्विनने 34 वेळा एका डावात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या. दुसरीकडे, अँडरसनच्या नावावर 183 कसोटी सामन्यांमध्ये 690 विकेट आहेत. अँडरसनने 32 डावात पाच विकेट घेतल्या आहेत.

दरम्यान, 41 वर्षीय जेम्स अँडरसन 700 कसोटी बळी घेणारा जगातील तिसरा आणि पहिला वेगवान गोलंदाज ठरणार आहे. मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न यांनीही 700 चा टप्पा ओलांडला, जरी या दोघांनी फिरकी गोलंदाजी केली. दुसरीकडे आर. कसोटीत 500 बळींचा टप्पा गाठणारा अश्विन हा दुसरा भारतीय खेळाडू ठरणार आहे. अनिल कुंबळे हा भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. कुंबळेने 132 कसोटी सामन्यात 619 विकेट घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 10/74 अशी होती.

सर्वाधिक कसोटी विकेट्स

1. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका 1992-2010): 133 कसोटी – 800 विकेट्स

2. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया 1992-2007): 145 कसोटी – 708 विकेट

3. जेम्स अँडरसन (इंग्लंड 2003-2023): 183* कसोटी - 690* विकेट

4. अनिल कुंबळे (भारत 1990-2008): 132 कसोटी – 619 विकेट्स

5. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड 2007-2023): 167 कसोटी – 604 विकेट

6. ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया 1993-2007): 124 कसोटी - 563 विकेट

7. कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडीज 1984-2001): 132 कसोटी - 519 विकेट

8. नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया 2011-2023): 123* कसोटी - 501* विकेट

9. रविचंद्रन अश्विन (भारत 2011-2023): 95* कसोटी - 490* विकेट

दुसरीकडे, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलचाही पहिल्यांदाच टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि यष्टिरक्षक ईशान किशन टीम इंडियाचा भाग नाहीत.

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी: 25-29 जानेवारी, हैदराबाद

दुसरी कसोटी: 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम

तिसरी कसोटी: 15-19 फेब्रुवारी, राजकोट

चौथी कसोटी: 23-27 फेब्रुवारी, रांची

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT