टीम इंडियाचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी पूर्ण केले आहेत. यासह अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरला. त्याचबरोबर या कामगिरीसह तो अनिल कुंबळेच्या क्लबमध्ये दाखल झाला.
अश्विनने 98व्या कसोटीतील 184 डावात 500 बळींचा टप्पा गाठला. इंग्लंडचा सलामीचा फलंदाज जॅक क्रॉलीची विकेट घेत त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली. विशेष म्हणजे, हा आकडा गाठणारा तो जगातील एकूण 9वा गोलंदाज ठरला. याशिवाय, 500 बळींच्या क्लबमध्ये सामील होणारा तो जगातील पाचवा फिरकी गोलंदाज ठरला.
ऐतिहासिक क्षणाचा व्हिडिओ
खरे तर, विकेट्सच्या बाबतीत अश्विनने अनिल कुंबळेला (Anil Kumble) मागे टाकलेले नाही. पण सर्वात जलद 500 विकेट घेणारा भारतीय होण्याच्या बाबतीत अश्विन कुंबळेच्या पुढे गेला आहे. अनिल कुंबळेने आपल्या 105व्या कसोटीत 500 बळींचा टप्पा गाठला होता. अश्विनने आपल्या 98व्या कसोटीत ही कामगिरी केली. एकूणच, संपूर्ण जगात सर्वात वेगवान 500 कसोटी बळींचा विक्रम मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे.
(बॉलनुसार)
25528 चेंडू- ग्लेन मॅकग्रा
25714 चेंडू- रविचंद्रन अश्विन
28150 चेंडू- जेम्स अँडरसन
28430 चेंडू- स्टुअर्ट ब्रॉड
28833 चेंडू- कोर्टनी वॉल्श
मुथय्या मुरलीधरन- 87 वी कसोटी
रविचंद्रन अश्विन- 98वी कसोटी
अनिल कुंबळे- 105वी कसोटी
शेन वॉर्न- 108वी कसोटी
ग्लेन मॅकग्रा- 110वी कसोटी
रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स तसेच 3308 धावा आहेत. त्याने भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 5 शतके आणि 14 अर्धशतकेही केली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अश्विनच्या नावावर 116 सामन्यांमध्ये 707 धावा आणि 156 विकेट आहेत.
टी-20 इंटरनॅशनलमध्ये अश्विनने भारतासाठी 65 मॅचमध्ये 72 विकेट घेतल्या आहेत. भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शाह यांनी अश्विनला शुभेच्छा दिल्या आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केली. दोन सामन्यांनंतर, म्हणजे अश्विनने या मालिकेत सातत्यपूर्ण खेळ केला तर तो त्याचा 100 वा कसोटी सामनाही धरमशाला येथे खेळेल.
1. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका 1992-2010): 133 कसोटी – 800 विकेट्स
2. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया 1992-2007): 145 कसोटी – 708 विकेट
3. जेम्स अँडरसन (इंग्लंड 2003-2023): 185* कसोटी - 696* विकेट
4. अनिल कुंबळे (भारत 1990-2008): 132 कसोटी – 619 विकेट्स
5. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड 2007-2023): 167 कसोटी – 604 विकेट
6. ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया 1993-2007): 124 कसोटी - 563 विकेट
7. कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडीज 1984-2001): 132 कसोटी - 519 विकेट
8. नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया 2011-2023): 127* कसोटी - 517* विकेट
9. रविचंद्रन अश्विन (भारत 2011-2023): 98* कसोटी - 500* विकेट
1. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका): 133 कसोटी – 800 विकेट्स
2. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया): 145 कसोटी – 708 विकेट्स
3. अनिल कुंबळे (भारत): 132 कसोटी – 619 विकेट
4. नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया): 127* कसोटी – 517* विकेट
5. रविचंद्रन अश्विन (भारत): 98 कसोटी*- 500* विकेट्स
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.