Ravichandran Ashwin on Vaibhav Suryavanshi Dainik Gomantak
क्रीडा

"वैभव सूर्यवंशी लहान आहे, टीम इंडियात आणण्याची घाई कशाला?" अश्विनची रोखठोक प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाला दिग्गज फिरकीपटू?

Ravichandran Ashwin on Vaibhav Suryavanshi: आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये आपल्या फटकेबाजीने क्रिकेट विश्व हादरवून सोडणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

Sameer Amunekar

मुंबई: आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये आपल्या फटकेबाजीने क्रिकेट विश्व हादरवून सोडणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (CSK) गुवाहाटीच्या कठीण खेळपट्टीवर वैभवने केवळ १५ चेंडूत अर्धशतक ठोकले. या खेळीनंतर मोहम्मद कैफ आणि मायकल वॉन यांसारख्या दिग्गजांनी त्याला तातडीने भारतीय संघात स्थान देण्याची मागणी केली आहे. मात्र, भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने यावर वेगळी भूमिका मांडत सर्वांना संयम राखण्याचा सल्ला दिला आहे.

अश्विनचे सूचक विधान

आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विनने वैभव सूर्यवंशीच्या भविष्याबाबत अत्यंत परिपक्व मत व्यक्त केले. अश्विन म्हणाला, "वैभवला आत्ताच कोणतेही मोठे लक्ष्य देऊ नका. तो अजून पूर्णपणे मोठाही झालेला नाही, तो अजून लहान मुलगा (बच्चा) आहे. जर महेंद्रसिंग धोनी वयाच्या ४४-४५ व्या वर्षापर्यंत खेळू शकतो आणि वैभवने वयाच्या ४० पर्यंत क्रिकेट खेळले, तर त्याच्याकडे अजून अडीच दशकांचे करिअर शिल्लक आहे. त्यामुळे त्याला आत्ताच टीम इंडियात आणण्याची घाई कशाला?"

'त्याला एकटे सोडा, योग्य वेळ येईल'

वैभवच्या प्रतिभेचे कौतुक करताना अश्विनने त्याला सध्या प्रसिद्धीच्या झोतातून थोडे दूर ठेवण्याचे आवाहन केले. "त्याला सध्या एकटे सोडा, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तो स्वतःहून भारतीय संघात येईल. तो इतका दर्जेदार खेळाडू आहे की, भारतासाठी खेळल्याशिवाय तो राहणार नाही. पण तो कधी खेळणार? यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल. आपण नेहमी इतक्या घाईत का असतो?" असा सवाल अश्विनने क्रिकेट चाहत्यांना आणि निवडकर्त्यांना विचारला आहे.

आयपीएल इतिहासातील तिसरे वेगवान अर्धशतक

CSK विरुद्धच्या सामन्यात १२८ धावांचा पाठलाग करताना वैभवने वादळी फलंदाजी केली. त्याने अवघ्या १५ चेंडूत ५२ धावा कुटल्या, ज्यामध्ये ५ उत्तुंग षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. ३०५.८८ च्या स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या वैभवने आयपीएल इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला. अवघ्या १५ व्या वर्षी त्याने दाखवलेला हा आत्मविश्वास पाहून अनेक दिग्गज थक्क झाले असले तरी, अश्विनच्या मते त्याला प्रगल्भ होण्यासाठी अजून वेळ देणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT