Jasprit Bumrah Dainik Gomantak
क्रीडा

शास्त्री मास्तर की जुबानी...'बुमराहला टीम इंडियाचा कर्णधार का बनवू नये'

भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी जसप्रीत बुमराहला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार बनवू नये', असे मत व्यक्त केले.

दैनिक गोमन्तक

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा 15 जानेवारी रोजी केली, त्यामुळे कसोटी संघाची कमान कोण सांभाळणार याची चर्चा सुरू आहे. त्यातच भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी 'जसप्रीत बुमराहला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार बनवू नये', असे मत व्यक्त केले. असे म्हटल्या जाते की, रोहित शर्मा हा तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करेल.

टी-20 आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संघांचे कर्णधारपद हे रोहितकडे सोपवण्यात आले आहे तर उपकर्णधार पदाची जबाबदारी ही केएल राहुल कडे दिली आहे. कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी केएल राहुल, ऋषभ पंत (Rishabh Pant) यांचीही नावे समोर आली आहे तर दुसरीकडे बुमराहने संधी दिल्यास कर्णधारपदासाठी तयार असल्याचेही सांगितले आहे.

शोएब अख्तरसोबत झालेल्या संभाषणात बुमराहला (Jasprit Bumrah) कर्णधारपद सोपवण्याबाबत रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले की, 'मी याबावत कधीच विचार केला नाही. भारतात कर्णधारपदासाठी आमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भारतात वेगवान गोलंदाजाला कर्णधार बनणे कठीण जाईल. एका वेगवान गोलंदाज कर्णधार हा अष्टपैलू असावा किंवा तो बॉब विलिस सारखा असावा.'

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विराट कोहली जखमी झाल्यानंतर केएल राहुलने कर्णधारपद तर जसप्रीत बुमराहला उपकर्णधार बनवले. टीम इंडियाच्या (India) कर्णधारपदावरून 2021 च्या टी-20 विश्वचषकापासूनच वाद सुरूआहे. विराटने सांगितले होते की, T20 विश्वचषकापूर्वीच, मी कर्णधारपदावरून पायउतार होईल पण वनडे आणि कसोटी संघांचे नेतृत्व करत राहील. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने (Bcci) एकदिवसीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT