Tilak Varma Dainik Gomantak
क्रीडा

एमआयच्या टिळक वर्माचे रवी शास्त्रींनी केले तोंड भरून कौतुक

टिळक वर्माच्या खेळीमुळे रवी शास्त्री खूप प्रभावित झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी (Ravi Shastri) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) युवा फलंदाज टिळक वर्माच्या (Tilak Varma) कामगिरीने आणि त्याच्याकडे असलेल्या शॉट्स खेळण्याच्या पद्धतीने खूप प्रभावित झाले आहेत. (Ravi Shastri praised MI's Tilak Verma)

टिळक वर्माने शनिवारी डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी, मुंबई येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध (Rajasthan Royal) 33 चेंडूत 61 धावा केल्या. स्टार स्पोर्ट्सवरील क्रिकेट लाइव्हवर बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, "मुंबई इंडियन्ससाठी खेळलेल्या दोन्ही डावांमध्ये टिळकने भरपूर क्षमता दाखवली. त्याचे शॉट्स-फ्रंट फूट, बॅक फूट, स्वीप या खेळीला पाहून मी प्रभावित झालो आहे आणि त्याचे शॉट सिलेक्शन देखील खूप चांगले आहे.

तरुण खेळाडूसाठी त्याची संयम, देहबोली आणि स्वभाव खूपच चांगला आहे. त्याने अतिशय आत्मविश्वासाने फलंदाजी केली आहे. या खेळाडूमध्ये पुढे जाण्याची पुर्णपणे क्षमता आहे." सूर्यकुमार यादव यांच्यासह टिळक वर्मा मुंबई इंडियन्सची मधली फळी मजबूत करतील, असा दावाही शास्त्री यांनी केला आहे.

"टिळक वर्माने त्याच्या फलंदाजीने सकारात्मक हेतू दाखवला आणि मुंबई इंडियन्ससाठी ही चांगलीच चिन्हे आहेत. एकदा सूर्यकुमार यादव प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला की मुंबईची मधली फळी मजबूत होईल," असे देखील शास्त्री म्हणाले. MI ला अजून IPL 2022 मध्ये त्यांचे पॉइंट टॅली उघडणे बाकी आहे कारण त्यांनी दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्धचे पहिले दोन सामने गमावले. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर बुधवारी त्यांचा पुढील सामना कोलकाता नाईट रायडर्सशी (KKR) होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT