Ravi Shastri massage for Ishan Kishan and Shreyas Iyer Dainik Gomantak
क्रीडा

Ravi Shastri: 'आव्हानांचा सामना करा, भूतकाळातील यश...', BCCI करार गमावलेल्या इशान-अय्यरला शास्त्री गुरुजींचा स्पेशल मेसेज

Pranali Kodre

Ravi Shastri Massage for Shreyas Iyer and Ishan Kishan after BCCI contract snub

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी (28 फेब्रुवारी) 2023-24 कालावधीसाठी भारतीय पुरुष क्रिकेटपटूंसाठी केंद्रिय वार्षिक करार जाहीर केला. मात्र या करारासाठी भारतीय क्रिकेटपटू इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचा विचार करण्यात आला नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले होते.

आता या दोघांनाही भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विशेष सल्ला दिला आहे.

दरम्यान बीसीसीआयने जरी श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना करारातूनबाहेर करण्याचे कारण दिले नसले तरी अनेक रिपोर्ट्सनुसार त्यांनी भारतीय संघातून बाहेर असताना रणजी क्रिकेट न खेळल्याने त्यांच्यावर ही कारवाई झाल्याचे म्हटले जात आहे.

इशान किशनने 2023 च्या अखेरीस दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून मानसिक थकव्याचे कारण देऊन पुन्हा परतल्यानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळले नव्हते.

तसेच श्रेयस अय्यरही इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यानंतर भारतीय संघातून वगळण्यात आल्यानंतर मुंबईकडून रणजी ट्रॉफीचा सामने खेळला नव्हता. याचमुळे त्यांच्यावर कारवाई झाल्याचे म्हटले जात आहे.

आता याबद्दल बोलताना शास्त्री यांनी त्यांना मजबूत पुनरागमन करा, असा सल्ला दिला आहे. याशिवाय शास्त्री यांनी बीसीसीआयने करार करताना घेतलेल्या निर्णयांचेही कौतुक केले आहे.

बीसीसीआयने यंदा पहिल्यांदाच उदयोन्मुख वेगवान गोलंदाजांसाठीही वेगळा करार जाहीर केला आहे. यामध्ये आकाश दीप, विजयकुमार वैशाख, उमरान मलिक, यश दयाल आणि विद्वख कावरेप्पा यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.

शास्त्री यांनी पोस्ट करून लिहिले की 'बीसीसीआय आणि जय शाह यांचे वेगवान गोलंदाजांसाठी दिलेल्या कराराचा मोठा निर्णय घेतल्याबद्दल विशेष अभिनंदन. यावर्षाच्या अखेरीसपर्यंत सज्ज होण्यासाठी घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय आहे. कसोटी क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटवर भर देण्यासाठी हा शक्तीशाली संदेश आहे आणि आपल्या आवडत्या खेळाच्या भविष्यासाठी योग्य मार्ग आहे.'

शास्त्री यांनी त्यांच्या पुढच्या पोस्टमध्ये इशान आणि श्रेयस यांच्यासाठी संदेश लिहिला की 'क्रिकेटमध्ये तुमचे पुनरागमनच तुमचे धैर्य दाखवून देते. श्रेयस अय्यर आणि इशान किशन मान वर करा आणि मेहनत करा, आव्हानांचा सामना करा आणि पूर्वीपेक्षा अधिक मजबूत पुनरागमन करा. तुमचे भूतकाळातील यश बोलके आहे आणि मला यात काहीच शंका नाही की तुम्ही पुन्हा जिंकाल.'

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की या घटना घडत असतानाच श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला असून तो 2 मार्चपासून चालू झालेल्या उपांत्य फेरीत मुंबईचे प्रतिनिधित्व करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT