Ravi Shastri - Tam India X/BCCI
क्रीडा

Ravi Shastri Video: पंतचा चौकार अन् गॅबावरील विजय सर्वोच्च, BCCI कडून जीवनगौरव स्विकारल्यानंतर शास्त्री भावूक

BCCI कडून जीवनगौरव पुरस्कार स्विकारल्यानंतर रवी शास्त्री यांनी त्यांच्या कारकिर्दीती सर्वोच्च बिंदू कोणता होता याबद्दल खुलासा केला आहे.

Pranali Kodre

Ravi Shastri choose Team India's Gabba Test win as "icing on the cake" moment after honoured with Col CK Nayudu Lifetime Achievement Award:

मंगळवारी (२३ जानेवारी) बीसीसीआयचा पुरस्कार सोहळा पार पडला. हा पुरस्कार सोहळा चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर झाला. गेल्या चार वर्षात कोविडमुळे हा पुरस्कार सोहळा घेण्यात आला नव्हता. त्यामुळे गेल्या चार वर्षातील पुरस्कार यावेळी देण्यात आले.

दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यात कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्काराने माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनियर आणि रवी शास्त्री यांना गौरविण्यात आले. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्विकारल्यानंतर रवी शास्त्री भावुक झाले होते. दरम्यान, त्यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीती सर्वोत्तम क्षणाचा खुलासा केला आहे.

शास्त्री यांनी त्यांच्या कारकिर्दीत अष्टपैलू खेळाडू म्हणून संघांना मोठे विजय मिळवून दिले. तसेच नंतर त्यांनी समालोचन क्षेत्रातही त्यांची वेगळी ओळख निर्माण केली. त्याचबरोबर त्यांनी भारतीय संघाचे यशस्वी प्रशिक्षणही केले.

त्यामुळे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील विविध क्षणांबद्दल भाष्य केले. पण या सगळ्यात भारतीय संघाने ब्रिस्बेनला गॅबा स्टेडियमवर जानेवारी २०२१ मध्ये मिळवलेला विजय हा सर्वोत्तम क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.

या सोहळ्याचा निवेदन हर्षा भोगले करत होते. त्यांनी शास्त्री यांना त्यांच्या कारकिर्दीतील त्यांच्या अविस्मरणीय क्षणांबद्दल प्रश्न विचारला.

यावेळी शास्त्री यांनी सांगितले की 'एक क्षण निवडणे आवघड आहे. तुम्ही आत्ता क्लिप दाखवली, त्यातील 1985 सालच्या स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धचा अंतिम सामना होता. ती मेलबर्नमधील संध्याकाळ खूप खास होती. 1983 वर्ल्डकप जिंकल्यानंतर लॉर्डच्या बाल्कनीतील हजेरी, वेस्ट इंडिजमधील शतके, ऑस्ट्रेलियातील द्विशतक, असे अनेक क्षण आहेत.'

'समालोचन करत असताना जेव्हा धोनीने 2011 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात मारलेला षटकार, जेव्हा 2007 टी20 वर्ल्डकप भारताने जिंकला, असे काही क्षण आहे.'

'पण जर तू मला तो एक क्षण विचारत असशील, जो सर्वाच्च आहे, तर मी म्हणेल गॅबावर मिळवलेला विजय, जेव्हा ऋषभ पंतने विजयी धाव काढत भारताला जिंकून दिले होते. ते सर्वात मौल्यवान मेडल होते, जे तुम्हाला मिळाले आहे.'

खंरतर जानेवारी 2021 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने ब्रिस्बेन कसोटी जिंकत सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन भूमित कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यातही ब्रिस्बेनमधील गॅबा स्टेडियमवर मिळवलेला विजय आणखी खास होता. कारण गॅबा हे ऑस्ट्रेलियन संघाचा बालेकिल्ला समजला जातो.

भारताने विजय मिळवण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ या मैदानात तब्बल तीन दशके अपराजीत होता. त्यांना तीन दशकात या मैदानावर कोणीही पराभूत करू शकले नव्हते. त्यातच भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली त्याच्या मुलीच्या जन्मासाठी सामन्यापूर्वीच मायदेशी परतला होता, तर अनेक वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडू त्या दौऱ्यात दुखापतग्रस्त झाले होते.

त्यामुळे ब्रिस्बेन कसोटीत भारताचा युवा संघ खेळला होता. असे असतानाही भारतीय संघाने त्या सामन्यात विजय मिळवत ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात बालेकिल्ल्यात मात देण्याचा पराक्रम केला होता. विशेष म्हणजे त्यावेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री होते.

त्या सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात पंतने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तो सामनावीरही ठरला होता.

ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 328 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या दिवशी अखेरचे काही मिनिटे शिल्लक असताना पंतने चौकार ठोकत भारताचा विजय निश्चित केला होता. त्याने नाबाद 89 धावा केल्या होत्या. याच डावात शुभमन गिल (91) आणि चेतेश्वर पुजारा (56) यांनीही महत्त्वाची भूमिका निभावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 500 वर्षांपूर्वीचे दगड, पोर्तुगीज कालीन किल्ला, गर्दीपासून दूर 'या' गावाने जपलेय 'पारंपरिक पर्यटन'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-20 सामना रद्द! पुन्हा एकदा पाऊस ठरला व्हिलन; फॉर्ममध्ये परतला कर्णधार 'सूर्या'

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांची चौकशी करा, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मडगावच्या PSI विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

IND vs AUS 1st T20: सर्वात जलद 150 षटकार...! कर्णधार सूर्यकुमार यादवचं धूमशान, तूफानी षटकार ठोकत रोहित शर्माला सोडले मागे; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

India President: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी 'राफेल'मधून घेतली भरारी, पाकड्यांच्या दाव्याचीही पोलखोल; म्हणाल्या, 'हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव...' VIDEO

SCROLL FOR NEXT