Vidarbha Cricket Team
Vidarbha Cricket Team PTI
क्रीडा

Ranji Trophy 2023-24: अंतिम आठ संघ निश्चित! असे आहे उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक, जाणून घ्या कुठे पाहाणार सामने

Pranali Kodre

Ranji Trophy 2023-24 Quarter-Final schedule:

भारतातील प्रतिष्ठीत प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा रणजी ट्रॉफी 2023-24 ला गेल्यावर्षाच्या अखेरीस सुरुवात झाली असून आता या स्पर्धेतील सर्व लीग सामने खेळून झाले आहेत. त्यामुळे आता या हंगामातील रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीला सुरुवात होणार आहे. या हंगामातील एलिट ग्रुपमध्ये असलेल्या 32 पैकी अंतिम 8 संघ निश्चित झाले आहेत.

या आठ संघांमध्ये विदर्भ, सौराष्ट्र, मुंबई, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि बडोदा या संघांचा समावेश आहे. त्यामुळे हे आठ संघ आता उपांत्यपूर्व फेरीत खेळताना दिसतील.

विदर्भ आणि सौराष्ट्र यांनी एलिट ग्रुप ए मधून अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तसेच एलिट ग्रुप बी मधून मुंबई आणि आंध्र प्रदेशने पहिले दोन क्रमांक मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

एलिट ग्रुप सी मधून तमिळनाडू आणि कर्नाटक संघांनी पहिल्या दोन जागा मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. याशिवाय मध्यप्रदेश आणि बडोदा संघांनी एलिट डी ग्रुपमधून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

कधी सुरू होणार उपांत्यपूर्व फेरी?

रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीला 23 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. हे पाच दिवसांचे सामने असतील. उपांत्यपूर्व फेरीतील चारही सामन्यांच्या खेळाला प्रत्येक दिवशी सकाळी 9.30 वाजता सुरुवात होईल.

या उपांत्यपूर्व फेरीत विदर्भ विरुद्ध कर्नाटक, मुंबई विरुद्ध बडोदा, तमिळनाडू विरुद्ध सौराष्ट्र आणि मध्य प्रदेश विरुद्ध आंध्र प्रदेश संघांत सामने होणार आहेत.

दरम्यान उपांत्यपूर्व फेरीतील विजेते संघ 2 मार्चपासून चालू होणाऱ्या उपांत्य फेरीत खेळतील. त्यानंतर 10 ते 14 मार्चदरम्यान अंतिम सामना होणार आहे.

कुठे पाहाणार सामने?

रणजी ट्रॉफीच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण जिओ सिनेमा ऍप आणि वेबसाईटवर केले जात आहे.

असे आहे रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेच्या बाद फेरीचे वेळापत्रक

उपांत्यपूर्व फेरी - 23 ते 27 फेब्रुवारी 2024

  • विदर्भ विरुद्ध कर्नाटक - विदर्भ क्रिकेट असोसिएशन, नागपूर (वेळ - स. 9.30 वा.)

  • मुंबई विरुद्ध बडोदा - शरद पवार क्रिकेट ऍकेडमी बीकेसी, मुंबई (वेळ - स. 9.30 वा.)

  • तमिळनाडू विरुद्ध सौराष्ट्र - एसएनआर कॉलेज क्रिकेट ग्राऊंड, कोइंबतूर (वेळ - स.9.30 वा.)

  • मध्य प्रदेश विरुद्ध आंध्र प्रदेश - होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदूर (वेळ - स.9.30 वा.)

उपांत्य फेरी - 2 ते 6 मार्च 2024

अंतिम सामना - 10 ते 14 मार्च 2024

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हृदयविकाराच्या दुर्मिळ आजाराने जन्माला आले बाळ, 300 मिनिटांत बंगळुरुला एअरलिफ्ट करुन दिला दुसरा जन्म

Goa Today's News Live: दामोदर सप्ताहाचे यंदा 125वे वर्ष, 1 कोटी महसूलाचे टार्गेट!

Goa Mining: खाण कंपन्यांचे अर्ज पहिल्या फटक्यात मंजूर केलेले नाहीत; अडवलपाल, शिरगाव खाणींचेही दाखले अडले

Mhadei River: गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकसाठी महत्वाच्या म्हादईची 'प्रवाह'कडून पाहणी, 'जीवनदायिनी'साठी गोव्‍याची धडपड

Goa: पाच फूट अन् 45 किलोचा एक घड! सत्तरीतील शेतकऱ्याची कमाल; टिश्यू कल्चर पद्धतीनं घेतलं केळीचं उत्पादन

SCROLL FOR NEXT