Virat Kohli | Gautam Gambhir | Rajat Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Rajat Sharma Tweet: 'कुठेतरी कोणीतरी आनंदी...', विराटने शतक करताच रजत शर्मांचा गंभीरला अप्रत्यक्ष टोला!

विराट कोहलीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शतक केल्यानंतर रजत शर्मांनी केलेले ट्वीट सध्या चर्चेत आहे.

Pranali Kodre

Rajat Sharma Tweet After Virat Kohli Century: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धा विविध कारणांनी चर्चेत आली. यातील एक घटना म्हणजे 1 मे रोजी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्यानंतर बेंगलोरचा खेळाडू विराट कोहलीचे लखनऊचा खेळाडू नवीन उल हक आणि मार्गदर्शन गौतम गंभीर यांच्याबरोबर वाद झाले होते. या वादाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.

या घटनेनंतर विराट आणि गंभीर यांच्यातील चाहत्यांचेही दोन गट पडलेले दिसले. तसेच अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनीही यावर आपापली मते व्यक्त केली. दरम्यान, या वादात प्रसिद्ध पत्रकार आणि दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष रजत शर्मा यांनीही उडी घेतलेली दिसून आले आहे.

नुकताच 18 मे रोजी बेंगलोरने सनरायझर्स हैदराबाद संघाचा 8 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात विराटने 100 धावांची शतकी खेळी केली. या खेळीनंतर रजत शर्मा यांनी विराटचे कौतुक केले आहे. पण याबरोबरच त्यांनी एक उपहासात्मक टिप्पण्णीही केली आहे.

त्यांनी ट्वीट केले की 'विराटने शानदार शतक केले. त्याला पाहाताना छान वाटत होतो. पण नक्कीच कुठेतरी कोणीतरी कदाचीत आनंदी नसेल.'

रजत शर्मा यांनी या ट्वीटमध्ये कोणाचे नाव घेतले नसले, तरी त्यांनी हे अप्रत्यक्षरित्या गंभीरलाच टोला मारला असल्याचे अनेक क्रिकेट चाहत्यांनी अंदाज व्यक्त केले आहेत. कारण यापूर्वीही सोशल मीडियावर गंभीर आणि रजत शर्मा यांच्यात ट्वीटरवॉर पाहायला मिळाले होते.

याआधी 1 मे रोजी झालेल्या सामन्यात विराट आणि गंभीरमध्ये वाद झाल्यानंतर एका टीव्ही शो मध्ये रजत शर्मा यांनी भीरला विराटचा मत्सर वाटतो, असा दावा केला होता. हा दावा करतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

यानंतरच गंभीरने ट्वीट केले होते, ज्यात त्याने रजत शर्मा यांचे नाव न घेता दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद सोडल्याबद्दल त्यांना टोला मारला असल्याचे अनेक युजर्सने मत व्यक्त केले होते.

त्यावेळी गंभीरने ट्वीट केले होते की "'दबावाचे' कारण देऊन दिल्ली क्रिकेटमधून पळून गेलेला माणूस क्रिकेटची चिंता म्हणून पीआर विकण्यास उत्सुक आहे! हे कलयुग आहे जिथे ‘पळपुटे’ आपले ‘अदालत’ चालवतात."

त्यानंतर आता रजत शर्मा यांनी विराटच्या शतकानंतर ट्वीट करत गंभीरचा अप्रत्यक्ष चिमटा काढल्याचे म्हटले जात आहे.

बेंगलोरचा विजय

दरम्यान, 18 मे रोजी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने हेन्रिक क्लासेनच्या 104 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर 20 षटकात 5 बाद 186 धावा केल्या. त्यानंतर 187 धावांच्या आव्हानाचा पाठलाग बेंगलोरने 19.2 षटकात 2 विकेट्स गमावत हे आव्हान सहज पूर्ण केले.

बेंगलोरकडून विराटने 63 चेंडूत 100 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 4 षटकार मारले. तसेच फाफ डू प्लेसिसने 47 चेंडूत 71 धावांची खेळी केली. या दोघांनी सलामीला 172 धावांची भागीदारी केली. त्यामुळे बेंगलोरला या सामन्यात विजय मिळवणे सोपे गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT