RCB vs RR: IPL 2022  Twitter
क्रीडा

14 वर्षांनंतर राजस्थान अंतिम फेरीत, संघाला झाली शेन वॉर्नची आठवण

शेन वॉर्न या जगात नसल्यामुळे राजस्थानच्या या खास विजयावर चाहते त्याची आठवण काढत आहेत.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये (IPL Qualifier 2) राजस्थान रॉयल्स (आरआर) च्या विजयावर सोशल मीडिया देखील नाचत दाद देत आहे. हा सामना जिंकून राजस्थानने 14 वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी 2008 मध्ये झालेल्या आयपीएलच्या पहिल्या सत्रात राजस्थानने अंतिम फेरी गाठली होती आणि शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली हा संघ पहिला आयपीएल चॅम्पियनही ठरला होता. आता यावेळी शेन वॉर्न (Shane Warne) या जगात नसल्यामुळे राजस्थानच्या (RR) या खास विजयावर चाहते त्याची आठवण काढत आहेत.

शेन वॉर्न या वर्षी मार्चमध्ये थायलंडमधील एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळला होता. अचानक त्याने जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला होता. वॉर्नच्या मृत्यूनंतर जगभर त्याची आठवण झाली. ऑस्ट्रेलियापासून भारतापर्यंत शेन वॉर्नला अंतिम श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आयपीएलची राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी त्याची आठवण ठेवण्यात आघाडीवर आहे. संघाच्या जर्सीच्या कॉलरवर शेन वॉर्नचे नाव लिहिलेले आहे. फ्रँचायझी त्याला 'फर्स्ट रॉयल' ही पदवीही देत आहे.

राजस्थान संघाने हा संपूर्ण हंगाम शेन वॉर्नला समर्पित केला आहे. सामना जिंकल्यानंतर अनेकदा खेळाडूंना शेन वॉर्नची आठवण झाली. दुसरा क्वालिफायर सामना जिंकल्यानंतर 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरलेल्या जोस बटलरलाही शेन वॉर्नची आठवण झाली. अशा परिस्थितीत आता राजस्थानचा संघ आयपीएल ट्रॉफी जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर असताना सोशल मीडियावर शेन वॉर्नची खूप आठवण येत आहे. आणि शेन वॉर्नच्या आठवणीत सोशल मिडियाही वाहून निघाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT