Rahul Dravid ICC
क्रीडा

Rahul Dravid: मैदानात टीम इंडियाची फटकेबाजी, पण लक्ष वेधलं ड्रेसिंग रुममधील द्रविडने! असं काय घडलं, पाहा

India vs Netherlands World Cup: वर्ल्डकप 2023 मधील भारत विरुद्ध नेदरलँड्स यांच्यातील सामन्यादरम्यान अचानक ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या राहुल द्रविडने सर्वांचे लक्ष वेधले होते.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Netherlands, Rahul Dravid Video:

रविवारी (12 नोव्हेंबर) भारत विरुद्ध नेदरलँड्स संघात वनडे वर्ल्डकप २०२३ मधील अखेरचा सामना होत आहे. बंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी करत वर्ल्डकपमधील त्यांची दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम धावसंख्या उभारली.

मात्र, असे असले तरी भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने ड्रेसिंग रुममधून लक्ष वेधले. झाले असे की या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघ प्रथम फलंदाजीला उतरला होता.

यावेळी 38 व्या षटकात केएल राहुल आणि श्रेयस अय्यर फलंदाजी करत होते. त्याचवेळी मैदानातील मोठ्या स्क्रिनवर राहुल द्रविडचा 1999 वर्ल्डकपमध्ये शतक केल्यानंतर सेलिब्रेशन करतानाचा फोटो दाखवण्यात आला.

त्याचवेळी तो फोटो पाहून ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या राहुल द्रविडने भन्नाट रिऍक्शन दिली. त्याने हात वर करत सर्वांनी दिलेला मान स्विकारत असल्याचे हावभाव केला, त्यावेळी त्याच्या आजुबाजूला असलेल्या भारतीय संघातील खेळाडूंनी आणि सदस्यांनाही हासू आवरले नाही. त्यांनीही टाळ्या वाजवत त्याचे कौतुक केले. यावेळी समालोचन हर्षा भोगले करत होते.

या क्षणाचा व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यावर अनेक कमेंट्स येत आहेत.

राहुल द्रविडसाठी खेळाडू म्हणून इंग्लंडला झालेला 1999 चा वर्ल्डकप वैयक्तिकदृष्टीने खूप शानदार राहिला होता. त्याने त्या वर्ल्डकपमध्ये 2 शतके करत सर्वाधिक 461 धावा फटकावल्या होत्या. ज्यात 3 अर्धशतकांचाही समावेश होता.

तसेच लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की बंगळुरूतील स्टेडियमवर हे द्रविडचे घरचे मैदान आहे. त्यामुळे त्याचा फोटो मोठ्या स्क्रिनवर झळकला होता.

दरम्यान, सामन्यातबद्दल सांगायचे तर भारताकडून श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी शतकी खेळी केली. श्रेयसने 94 चेंडूत 5 षटकार आणि 10 चौकारांसह 128 धावांची नाबाद खेळी केली. तर केएल राहुलने 64 चेंडूत 4 षटकार आणि 11 चौकारांसह 102 धावांची खेळी केली. 

तसेच रोहित शर्माने 61 धावांची, शुभमन गिलने 51 धावांची आणि विराट कोहलीने 51 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने 50 षटकात 4 बाद 410 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT