Rahul Dravid Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: राहुल द्रविड यांच्या 'या' वक्तव्याने उडाली खळबळ, खेळपट्टीच्या वादावर दिले चोख उत्तर!

IND vs AUS 4th Test Match: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये आतापर्यंत फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या पाहायला मिळाल्या आहेत.

Manish Jadhav

IND vs AUS 4th Test Match: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये आतापर्यंत फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या पाहायला मिळाल्या आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत तीन कसोटी सामने खेळले गेले आहेत, (IND vs AUS) आणि हे सर्व सामने तीन दिवस आधी संपले आहेत.

अशा परिस्थितीत या सामन्यांमध्ये खेळपट्ट्यांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सगळ्या दरम्यान टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी खेळपट्टीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

राहुल द्रविड यांच्या या वक्तव्याने उडाली खळबळ

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील सामने फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर खेळवण्यास कोणतीही शंका नाही.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC 2023) मध्‍ये गुण महत्त्वाचे आहेत. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या 2-1 ने पुढे आहे.

आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील विकेट खराब असल्याचे घोषित केल्यानंतर, टर्न-टेकिंग विकेट्सच्या तयारीची चर्चा सुरु झाली आहे. अशा विकेटवर सामना तीन दिवसांत संपतो.

त्यामुळे फिरकीला अनुकूल खेळपट्टीचा वापर केला जात आहे

द्रविड यांनी नागपूर, दिल्ली (Delhi) आणि इंदूरच्या विकेट्सचा बचाव केला आणि म्हणाले की, 'मी या प्रकरणातील जास्त तपशीलात जाणार नाही. सामनाधिकारी त्यांचे मत व्यक्त करण्यास मोकळे आहेत. मी त्यांच्या मतांशी सहमत आहे की नाही हे महत्त्वाचे नाही. माझे मत काय आहे हे ही महत्त्वाचे नाही. पण जेव्हा डब्ल्यूटीसीच्या गुणांमध्ये फरक पडतो, तेव्हा तुम्हाला अशा विकेटवर खेळावे लागेल जे निकाल देईल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT