द्रविडने (Rahul Dravid) टीम इंडियाच्या (Team India) मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे.  Dainik Gomantak
क्रीडा

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अखेर राहुल द्रविड यांनी भरला अर्ज

द्रविडने (Rahul Dravid) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. तर लक्ष्मण (VVS Laxman) एनसीए (NCA) प्रमुखपदाच्या शर्यतीत आहे. मात्र याबाबत अद्याप बोलणी सुरू आहेत.

दैनिक गोमन्तक

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) प्रमुख राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी टीम इंडियाच्या (Team India) मुख्य प्रशिक्षकपदासाठी (Head coach) अर्ज केला आहे. मंगळवार (26 ऑक्टोबर) प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहिनुसार, याची पुष्टी करण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) एनसीए प्रमुख होण्याची शक्याता आहे.

एएनआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, द्रविडने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. तर लक्ष्मण (व्हीव्हीएस लक्ष्मण) एनसीए प्रमुखपदाच्या शर्यतीत आहे. मात्र याबाबत अद्याप बोलणी सुरू आहेत.

त्याच वेळी, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, "आज अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याने राहुलने औपचारिकपणे अर्ज केला आहे. त्याचबरोबर गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अभय शर्मा यांनी यापूर्वीच एनसीएकडे अर्ज केला आहे. त्यांचा अर्ज ही केवळ औपचारिकता होती.

द्रविडच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेने भारतीय क्रिकेटच्या एका नव्या पर्वाची सुरुवात होईल. ज्यामध्ये संघाला नवीन टी-२० कर्णधार देखील मिळेल. भारताचे माजी महान फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण पुन्हा एकदा एनसीए प्रमुखपदाच्या शर्यतीत आहेत. लक्ष्मण आता आयपीएलचा संघ सनरायझर्स हैदराबादचा मेंटर असणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अशा स्थितीत त्यांची निवड झाली तर समालोचन आणि स्तंभलेखनाचे काम त्यांना सोडून द्यावे लागेल.

राष्ट्रीय प्रशिक्षक आणि NCA प्रमुख भारतीय क्रिकेटच्या हितासाठी एकत्र काम करतात. द्रविड आणि लक्ष्मण हे दक्षिण विभागासाठी देशांतर्गत क्रिकेटनंतर भारतीय संघासाठी एकत्र खेळले आहेत. त्यांच्यामध्ये चांगला संवाद देखील आहे. लक्ष्मण यांनी या पदासाठी स्वारस्य दाखवले नसून बीसीसीआय त्यांच्याशी पुन्हा संपर्क करणार आहे. अनिल कुंबळे यांचेही नाव या पदासाठी समोर येत आहे. पण बोर्डाकडून अद्याप त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला नाही.

रवी शास्त्री पगार – 5.5 कोटी + बोनस

राहुल द्रविडने पगार देऊ केला - 10 कोटी + बोनस

बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने IPL फायनलनंतर एका माध्यमाला सांगितले की, "द्रविडने होय म्हटले आहे, ते भारतीय संघाचा पुढील मुख्य प्रशिक्षक असतील. ते लवकरच एनसीएचे प्रमुख पद सोडतील.” एका वृत्तानुसार, द्रविडचे विश्वासू सहकारी पारस म्हांबरे यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येण्याची शक्यता आहे. तर विक्रम राठोर हे संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कायम राहणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT