Rahul Dravid - Akash Deep X/BCCI
क्रीडा

IND vs ENG: W,W,W... द्रविडचा कानमंत्र अन् आकाशचा भेदक मारा, तासाभरातच 3 विकेट्स घेत इंग्लंडचं वाढवलं टेन्शन

Akash Deep Debut Wickets Video: रांचीमध्ये सुरू असेलल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून पदार्पण केलेल्या आकाश दीपला राहुल द्रविडने भारतीय संघाची कॅप दिली. आकाशने पदार्पण करताच त्याच्या प्रतिभेची चुणूकही दाखवली.

Pranali Kodre

Rahul Dravid handed India Test Debut Cap to Akash Deep:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिका खेळली जात असून चौथा सामना शुक्रवारपासून (23 फेब्रुवारी) खेळला जात आहे. रांचीतील जेएससीएस आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना सुरू आहे. या सामन्यातून बंगालचा वेगवान गोलंदाज आकाश दीपने कसोटी पदार्पण केले आहे.

आकाश भारताकडून कसोटी पदार्पण करणारा 313 वा खेळाडू ठरला आहे. त्याला पदार्पणाची ३१३ क्रमांकाची कसोटी कॅप भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने दिली. यावेळी द्रविडने त्याच्यासाठी कौतुकास्पद भाष्यही केले. विशेष म्हणजे सामन्याच्या पहिल्याच तासात आकाशने त्याच्या प्रतिभेची चुणूक दाखवली.

त्याला पदार्पणाची कॅप देताना द्रविड म्हणाला, 'आकाश तुझा प्रवास बद्दी शहरापासून सुरू झाला, जे की रांचीपासून अवघ्या 200 किमी अंतरावर आहे. तू तुझ्या प्रवासात खुप संघर्ष केला आहे. खुप मेहनत केली आहे. तू अनेक चढ-उतार पाहिले आहेत.'

'तू स्वत: बद्दीवरून दिल्लीला क्रिकेट खेळायला आहे. 2007 टी20 वर्ल्डकपने तुला प्रेरणा दिली. तू दिल्लीत राहिला आणि मेहनत केली. तिथून तू कोलकाताला आलास, देशांतर्गत क्रिकेट खेळले आणि शानदार कामगिरी केली. तुझ्या या प्रवासाने तुला रांचीपर्यंत पोहचवले आहे. तुला आज भारतीय संघाची कॅप मिळत आहे.'

द्रविड पुढे म्हणाला, 'तुझ्यासाठी, तुझ्या आईसाठी आणि त्याचबरोबर तुझ्या कुटुंबियांसाठी हा खूप खास क्षण आहे. दुर्दैवाने तू तुझ्या वडिलांना आणि मोठ्या भावाला गमावले आहेस. पण आम्हाला खात्री आहे, ते जिथे कुठे असतील तिथून तुला आशिर्वादच देत असतील.

'संपुर्ण संघ तुला शुभेच्छा देत आहे. या क्षणांचा आणि सामन्याचा आनंद घे. इथे येण्यासाठी आणि तुझे स्वप्न पुर्ण करण्यासाठी तू खूप मेहनत घेतली आहे. तुझे स्वप्न पूर्ण होत असताना आम्ही तुझ्याबरोबर आहोत, याचा आनंद आहे. या पाच दिवसांचा आणि संपूर्ण कारकिर्दीचा आनंद घेत. अत्यंत आनंदाने मी तुला भारतीय संघाची ३१३ क्रमांकाची कॅप देत आहे.'

दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने भारतीय संघ प्रथम गोलंदाजीसाठी उतरला. प्रथम गोलंदाजी करताना भारताकडून चौथ्याच षटकात आकाश दीपने झॅक क्रावलीने 4 धावांवर त्रिफळाचीत केले होते. पण हा नो बॉल असल्याने क्रवलीला जीवदान मिळाले.

मात्र त्यानंतर आकाशने आपली अचूक आणि भेदक गोलंदाजी सुरू ठेवली होती. त्याने 10 व्या षटकात इंग्लंडला मोठा दुहेरी धक्का दिला. त्याने या षटकात दुसऱ्या चेंडूवर बेन डकेटला 11 धावांवर माघारी धाडले, तर नंतर चौथ्या चेंडूवर ऑली पोपला पायचीत करत दुसरी विकेट घेतली.

यानंतरही त्याने त्याच्या या स्पेलमध्ये 12 व्या षटकात आक्रमक खेळणाऱ्या आणि जीवदान दिलेल्या क्रावलीलाच 42 धावांवर माघारी धाडले. त्यामुळे तासाभरातच त्याने इंग्लंडला तीन मोठे धक्के दिले. त्यामुळे इंग्लंड संघ संकटात सापडला होता.

दरम्यान, आकाशच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी पॅरेलिसिसची झुंज देत असताना निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर लगेचच दोन महिन्यात त्याच्या मोठ्या भावाचेही आजारपणात निधन झाले.

मात्र आकाशने त्यातून सावरताना त्याच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवली.

त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या 30 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 104 विकेट्स घेतल्या आहे, तसेच 423 धावा केल्या आहेत. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT