Rafael Nadal rolandgarros
क्रीडा

Rafael Nadal: तो परत येतोय! लाल मातीच्या बादशाहने केली कमबॅकची घोषणा

Rafael Nadal Comeback: दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने कमबॅकची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

Rafael Nadal announced Comeback at Brisbane International ahead of Australian Open 2024:

टेनिसच्या नव्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. यातच आता टेनिस चाहत्यांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे. स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल नव्या हंगामात खेळताना दिसणार आहे. त्याने आपल्या पुनरागमनाची घोषणा केली आहे.

22 वेळचा राफेल नदाल जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या ब्रिस्बेन इंटरनॅशनल स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. त्यामुळे हे त्याचे जवळपास वर्षभरानंतर टेनिस कोर्टवर पुनरागमन असेल. तो त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन या वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतही खेळताना दिसणार आहे. ब्रिस्बेन इंटरनॅशनल ही ऑस्ट्रेलियन ओपनसाठी एकप्रकारे सराव स्पर्धा असेल.

नदाल अखेरचा ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेत खेळला होता. त्यावेळी त्याला दुसऱ्या फेरीनंतर बाहेर व्हावे लागले होते. त्याला हिप फ्लेक्सरची समस्या झाली होती. त्यानंतर त्याला बराच काळ दुखापतींनी घेरले. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय स्थरावर टेनिस खेळता आले नाही.

दरम्यान, आता त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत त्याच्या पुनरागमनाबद्दल माहिती दिली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की 'स्पर्धेपासून एक वर्षे दूर राहिल्यानंतर आता परत यायची वेळ झाली आहे. मी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ब्रिस्बेनमध्ये असेल. तिथेच भेटू.'

नदालने असेही म्हटले की त्याला दुखापतींच्या दरम्यान त्याची कारकिर्द संपवायची नाही. त्यामुळे टेनिस कोर्टवरच त्याच्या कारकिर्दीची अखेर व्हायला हवी.

लाल मातीचा बादशाह म्हणून ओळखला जाणाऱ्या नदालने अशीही आशा यापूर्वी व्यक्त केली होती की तो आणखी एक फ्रेंच ओपन स्पर्धा खेळेल आणि पुढीलवर्षी पॅरिसला होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये स्पेनचे प्रतिनिधित्व करेल. 2024 हंगाम हा नदालचा अखेरचा हंगाम असू शकतो अशी चर्चाही आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे प्रमुख क्रेग टिली यांनीही नदाल 2024 मध्ये या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची पुष्टी केली आहे.

तथापि, नदाल गेल्या वर्षभरात टेनिस खेळला नसल्याने त्याच्या जागतिक क्रमवारीतही मोठी घसरण झाली आहे. गेल्या 20 वर्षांत पहिल्यांदाच त्याची क्रमवारी 100 च्या खाली घसरली आहे. तो एकेरीत तब्बल 633 व्या क्रमांकावर घसरला आहे.

पण असे असले तरी तो कोणत्याही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र आहे, कारण तो गेल्या 6 महिन्यांपासून दुखापतीमुळे कोणतीही स्पर्धा खेळलेला नाही, अशा वेळी प्रोटेक्ट रँकिंगच्या नियमानुसार खेळण्यासाठी पात्र ठरतो.

टेनिसमध्ये जेव्हा खेळाडू जखमी होतो किंवा पालकत्व रजेवर असतो आणि कमीत कमी 6 महिने टेनिसपासून दूर असतो तेव्हा रँकिंग प्रोटेक्टचा नियम वापरला जाऊ शकतो.

अशावेळी खेळाडूला एटीपी किंवा डब्ल्यूटीए सीईओला लेखी विनंती करावी लागते की त्यांची क्रमवारी प्रोटेक्ट केली जावी. या नियमानुसार खेळाडूच्या दुखापतीच्या पहिल्या तीन महिन्यातील स्थानाची सरासरी काढली जाते. यामुळे खेळाडूला थेट पात्र ठरण्यासाठी मदत मिळू शकते.

नदालची ग्रँडस्लॅम विजेतीपदं

लाल मातीवर खेळली जाणारी फ्रेंच ओपन स्पर्धा नदालने विक्रमी 14 वेळा जिंकली आहे. तसेच त्याच्या 22 ग्रँड स्लॅम विजेतेपदांमध्ये 4 अमेरिकन ओपन, 2 विम्बल्डन आणि 2 ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT