Rafael Nadal to Miss Madrid Open: राफेल नदालच्या चाहत्यांना मोठा झटका, स्पॅनिश स्टारची माद्रिद ओपनमधून माघार!

Rafael Nadal: स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदालने गुरुवारी माद्रिद ओपनमधून माघार घेत असल्याची घोषणा केली.
Rafael Nadal
Rafael NadalDainik Gomantak

Rafael Nadal to Miss Madrid Open After Hip Recovery Setback: स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदालने गुरुवारी माद्रिद ओपनमधून माघार घेत असल्याची घोषणा केली.

हिपच्या दुखापतीमुळे नदाल यापूर्वीच कॅलिफोर्नियातील (California) मास्टर्स 1000 स्पर्धेला मुकला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात झालेल्या दुखापतीचा दाखला देत नदाल म्हणाला की, तो माद्रिद ओपनमधून माघार घेत आहे.

कठीण स्थितीत

गुरुवारी नदालने त्याच्या दुखापतीबाबत ट्विटरवर अपडेट शेअर केले. तो म्हणाला की, 'तो त्याच्या उपचार पद्धतीत बदल करेल आणि माद्रिदमध्ये पुढील आठवड्यात होणाऱ्या स्पर्धेतून बाहेर पडेल.'

नदालने आपल्या संदेशात पुढे म्हटले की, मागील काही आठवडे आणि महिने कठीण गेले आहेत. तुम्हाला माहिती आहे की, मला ऑस्ट्रेलियात (Australia) मोठी दुखापत झाली होती.'

Rafael Nadal
Gary Ballance Retires: दोन देशांसाठी शतक झळकावून इतिहास रचणाऱ्या क्रिकेटपटूने अचानक घेतला निवृत्तीचा निर्णय

अपेक्षेप्रमाणे परिस्थिती नाही

त्याने पुढे लिहिले- सुरुवातीला सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी रिकव्हरीचा होता, परंतु आता तो 14 आठवडे झाला आहे.

वस्तुस्थिती अशी आहे की, परिस्थिती आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही. दुर्दैवाने, मी माद्रिदमध्ये उपस्थित राहू शकणार नाही.

योग्य दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करण्याशिवाय पर्याय नाही

स्पॅनिश स्टार पुढे म्हणाला की, मी कालमर्यादा सांगू शकत नाही, कारण मला माहित असते तर मी तुम्हाला सांगितले असते. या स्पर्धांमध्ये आणि विशेषतः माद्रिदमध्ये खेळण्याचा माझ्यासाठी काय अर्थ आहे हे तुम्हा सर्वांना माहीत आहे.

शेवटी नदाल म्हणाला की, त्याला योग्य दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करण्याशिवाय पर्याय नाही. नदालच्या या विधानानंतर 28 मे ते 11 जून या कालावधीत होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये त्याची खेळण्याची शक्यता स्पष्ट झालेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com