Rachin Ravindra - Ruturaj Gaikwad | MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2024: ऋतुराजबरोबर रचिन रविंद्र करणार CSK साठी सलामीला फलंदाजी? धोनीला घ्यावा लागणार मोठा निर्णय

CSK Opening Pair: आयपीएल 2024 हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सकडून नवी सलामी जोडी खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

Pranali Kodre

Rachin Ravindra may play as Opener with Ruturaj Gaikwad for CSK in IPL 2024

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात चेन्नईला होणार आहे. परंतु, आयपीएलच्या या 17 व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे.

चेन्नईचा स्टार सलामीवर डेवॉन कॉनवे मेच्या सुरुवातीपर्यंत आयपीएलमधून बाहेर झाला आहे. कॉनवे चेन्नईच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक राहिला आहे.

त्याने 2023 मध्ये चेन्नईला विजेतेपद जिंकून देण्यातही मोलाचा वाटा उचलला होता. तो अंतिम सामन्यातील सामनावीरही ठरला होता. मात्र आता तो आयपीएलच्या १७ व्या हंगामातील जवळपास संपूर्ण पहिला टप्प्याला मुकणार आहे.

कॉनवेच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेदरम्यान अंगठ्याला दुखापत धाली होती. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सध्या चालू असलेल्या कसोटी मालिकेलाही मुकावे लागले आहे.

तसेच त्याच्या अंगठ्याच्या दुखापतीवर त्याला शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली आहे. त्यामुळे त्याला त्यातून सावरण्यासाठी 8 आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. म्हणजेच साधारण मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत त्याला खेळता येणार नाही.

कॉनवेने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 23 सामने खेळले असून 48.63 च्या सरासरीने 9 अर्धशतकांसह 924 धावा केल्या आहेत.

चेन्नईला शोधावा लागणार नवा सलामीवीर

दरम्यान, गेल्या काही हंगामापासून ऋतुराज गायकवाड चेन्नईचा नियमित सलामीवीर बनला आहे. त्याच्याबरोबर गेल्या दोन हंगामात कॉनवेने सलामीला फलंदाजी केली आहे. ऋतुराज आणि कॉनवेच्या जोडीने चेन्नईला अनेकदा चांगली सुरुवातही मिळवून दिली.

परंतु, आता कॉनवे अर्धा आयपीएल हंगाम मुकणार असल्याने ऋतुराजबरोबर सलामीला फलंदाजी करण्यासाठी चेन्नईला दुसऱ्या खेळाडूचा शोध घ्यावा लागणार आहे. दरम्यान, चेन्नईने कॉनवेचाच न्यूझीलंड संघातील साथीदार रचिन रविंद्रलाही आयपीएल लिलावातून संघात सामील करून घेतले आहे.

रचिनने 2023 वर्ल्डकपमध्ये भारतात खेळताना शानदार कामगिरी केली होती. त्यामुळे अशी चर्चा होत आहे की यंदा कॉनवेच्या अनुपस्थितीत रचिनला चेन्नई सलामीला संधी देऊ शकते. त्यामुळे आयपीएल 2024 मध्ये ऋतुराज आणि रचिन यांची नवी सलामी जोडी चेन्नईकडून खेळताना दिसू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT